आगोंद किनाऱ्यावर आढळला युकेतील महिलेचा मृतदेह तर, हणजूणमध्ये अमेरिकन नागरिकास मारहाण

राज्यात अलीकडच्या काळात परर्यटकांना मारहाणीच्या घटना वाढल्यामुळे व्यावसायिकांमध्ये कमालीची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Agonda And Anjuna News
Agonda And Anjuna News
Published on
Updated on

Goa Crime News: आगोंद किनाऱ्यावर युकेतील महिलेचा मृतदेह आढळला असून, येथे एक विदेशी तर एक परप्रांतीय नागरिकाचा मृत्यू होण्याच्या २ दिवसांत दोन घटना घडल्या.

तर, दिसऱ्या एका घटनेत हणजूणमध्ये अमेरिकन नागरिकास मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, 2 रोजी, रात्री 8 च्या सुमारास युके स्थित महिलेचा मृतदेह काणकोण पोलिसांनी हस्तगत केला.

पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून मृतदेह मडगाव जिल्हा इस्पितळात पाठवला. पोलिस निरीक्षक चंद्रकांत गावस यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

सदर महिला आगोंद येथील एका पर्यटक कुटीरात रहात होती. तिचे नाव एमा लुईस (45), असे तिच्या ओळख पत्रानुसार समजते.

हणजूणमध्ये अमेरिकन नागरिकास मारहाण

हणजूण येथील एका तारांकित हॉटेलमध्ये काही अनोळखी गेस्ट आणि हॉटेलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अमेरिकन मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हणजूण येथील एका तारांकित हॉटेलमध्ये 30 डिसेंबर रोजी ही मारहाणीची घटना घडली, ज्यात हणजूण येथील रहिवासी असलेले फिर्यादी यूएसए नागरिक जेम्स कोलमन चिझुगु हे वैध पाससह कार्यक्रमासाठी हॉटेलस्थळी गेले होते. तिथे काही विषयावरून वाद झाला आणि फिर्यादीला सात ते आठ जणांच्या जमावाने मारहाण केली, असे त्याने तक्रारीत म्हटले आहे.

या मारहाणीत फिर्यादीस दुखापत झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तारांकित हॉटेलचे सुरक्षा कर्मचारी व हॉटेलमधील अनोळखी गेस्ट यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या 143, 147, 323 व 149 कलमांनुसार गुन्हा नोंद केला आहे. हणजूण पोलिस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, राज्यात अलीकडच्या काळात परर्यटकांना मारहाणीच्या घटना वाढल्यामुळे व्यावसायिकांमध्ये कमालीची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com