

मोरजी: उगवे येथील माऊली मंदिर परिसरात पाणीपुरवठा करणारी जुनी जलवाहिनी गेल्या आठ दिवसांत तब्बल सात वेळा फुटल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. वारंवार फुटणाऱ्या जलवाहिनीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असून नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकावे लागत आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही जलवाहिनी अनेक वर्षांपूर्वी टाकण्यात आली असून ती आता पूर्णपणे जीर्ण झाली आहे. शिवाय, ही जलवाहिनी रस्त्याच्या मधोमध असल्याने प्रत्येक वेळी दुरुस्तीसाठी रस्ता खोदावा लागतो. त्यामुळे रस्त्याचीही मोठ्या प्रमाणात वाताहत होते. याचा वाहनचालक आणि पादचाऱ्यांनाही बराच त्रास सहन करावा लागतो.
ही जलवाहिनी पूर्णपणे जीर्ण झाल्याने ती वारंवार फुटते. दर दोन–तीन दिवसांनी हा प्रकार घडत असल्याने स्थानिक हैराण झाले आहेत. “हा त्रास आता असह्य झाला आहे,” असा त्रागा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. पावसाळ्यात ही स्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता असल्याने संबंधित विभागाने तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
स्थानिक प्रशासन आणि पाणीपुरवठा विभागाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.