Court
Court Dainik Gomantak

Goa Illegal Residence: गस्तीवर असलेल्या पोलिसांनी दोन महिलांची चौकशी; पुढे काय उघडकीस आले?

Ugandan Women Arrested by Goa Crime Branch Police: भारतातील वास्तव्याचा व्हिसा संपूनही बेकायदेशीरपणे राहत असलेल्या दोघा युगांडाच्या महिलांना क्राईम ब्रँच पोलिसांनी अटक केली.
Published on

Goa News: भारतातील वास्तव्याचा व्हिसा संपूनही बेकायदेशीरपणे राहत असलेल्या दोघा युगांडाच्या महिलांना क्राईम ब्रँच पोलिसांनी अटक केली. गेल्या काही दिवासांपासून क्राईम ब्रँचने देशात बेकायदेशीर वास्तव्य करून असलेल्या विदेशी नागरिकांची शोधमोहीम सुरू केली आहे.

Court
Illegal Constructions Demolished: याद राखा, अतिक्रमणे जमीनदोस्‍तच होणार! म्हापशात सहा बेकायदा बांधकामांवर फिरला ‘जेसीबी’

क्राईम ब्रँचचे पोलिस पथक काल रात्री खालचावाडा- हरमल येथे गस्ती असताना दोन विदेशी नागरिक फिरत असताना आढळून आले. त्यांची चौकशी केला असता त्यांच्याकडे पासपोर्ट नव्हता तसेच त्यांच्याकडे ट्रॅव्हलिंग दस्तावेज नव्हते व त्यांना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या विदेशी नागरिकांची नावे कॅथरिन नाकावुका (३८ वर्षे) व नातुकुंदा सुझान नलुईमा (२६ वर्षे) अशी आहेत. त्यांच्या या अटकेची सूचना एफआरआरओ व भारतातील युगांडाच्या दूतावासाला देण्यात आली आहे. या दोन्हीही संशयित महिलांना न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. त्यांनी विदेशी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com