Tourist Robbery at Arpora: पर्यटकांचे ऐवज लंपास करणाऱ्या एकाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

7.5 लाखाचे ऐवज जप्त
Anjuna Police
Anjuna PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा राज्यात सध्या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे वारे वेगाने वाहते आहे. यातच सध्या पर्यटन हंगाम तेजीत असल्याने गोवा पर्यटकांनी फुलला असल्याचे सध्या राज्यात सर्वत्र चित्र आहे. याचा फायदा घेत गुजराती पर्यटकास लुटणाऱ्या उडुपी येथील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. (Udupi resident arrested for stealing goods worth Rs 7.5 lakh from villa rented by tourist)

Anjuna Police
Joshua D'Souza Statement: पुढील दोन महिन्यांत होणार ‘मलनिस्सारण’ प्रकल्पाचे काम सुरु

मिळालेल्या माहितीनुसार बागा, हडफडे येथील समुद्र किनाऱ्यावर गुजराती पर्यटकांनी काही खोल्या भाड्याने घेतल्या आहेत. यात पर्यटकांनी आपल्या आवश्यक साहित्यासह मौल्यावान वस्तू देखील आहेत.

मौल्यावान वस्तूतील 4 मोबाईल फोन, स्मार्ट घड्याळे असे एकूण 7.5 लाख रुपयांच्या वस्तू चोरीला गेल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी उडपी, कर्नाटक येथील रहिवाशी असलेल्या श्रीकांत नामक संशयिताला ताब्यात घेतले आहे.

Anjuna Police
Subhash Phal Desai On IIT Sanguem: मंत्री फळदेसाई आयआयटीवर ठाम; 3 लाख चौ.मी. अतिरिक्त जमिनीची करणार मागणी

या प्रकरणातील संशयिताला बागा परिसरातून ताब्यात घेत पोलिसांनी आरोपीकडून 4 मोबाईल फोन, स्मार्ट घड्याळे व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत. तसेच संशयितावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com