Mhadei River: नदीवर आंघोळ करणं बेतलं जीवावर, म्हादईत बुडाले दोघेजण; गांजे येथील दुर्देवी घटना

Ganje Usgaon Accident: गांजे-उसगाव परिसरातील म्हादई नदीत रविवारी (1 जून) दुपारी आंघोळीसाठी गेलेल्या सहा तरुणांपैकी दोघे पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली.
Ganje Usgaon Accident
Mhadei RiverDainik Gomantak
Published on
Updated on

उसगाव: गांजे-उसगाव परिसरातील म्हादई नदीत रविवारी (1 जून) दुपारी आंघोळीसाठी गेलेल्या सहा तरुणांपैकी दोघे पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. दोघेजण पाण्यात अडकले असून त्यांची सुटका करण्यासाठी सध्या पोलीस आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सहा तरुणांचा एक गट रविवारी दुपारी आंघोळीसाठी म्हादई नदीच्या काठावर गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आणि नदीचा प्रवाह जोरात असल्याने यातील काही तरुण अचानक खोल पाण्यात ओढले गेले. यामध्ये दोनजण पूर्णपणे बुडाले असून त्यांचा शोध सुरु आहे. तर इतर दोघे पाण्यातील एका खडकावर अडकले आहेत.

Ganje Usgaon Accident
Goa Crime: फोंड्यात पत्नीचा निर्घृण खून, आरोपी पती स्वत: पोलिस ठाण्यात हजर; पुढील तपास सुरू

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच फोंडा पोलीस आणि अग्निशमन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. तरुणांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांचीदेखील मदत घेतली जात आहे. दरम्यान, बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी गोताखोरांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला अधिक जलद प्रतिसाद देण्याची मागणी केली असून, म्हादई नदीचा धोकादायक प्रवाह लक्षात नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com