Goa Police : दुचाकी चोर कुळे पोलिसांच्या ताब्यात; मोले चेकनाक्यावर कारवाई

वेर्णा येथून आरोपी फैयाज रफिक अहमद आणि नदीम मलिक यांनी दुचाकी लंपास केली होती.
Goa Crime News
Goa Crime News Dainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. गोवा पोलिसांनी चोरीला गेलेली एक दुचाकी शोधून काढली असून संबंधित चोराला अटक केली आहे. वेर्णा येथून आरोपी फैयाज रफिक अहमद आणि नदीम मलिक यांनी दुचाकी लंपास केली होती.

Goa Crime News
स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान, क्रीडा खात्याच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

या दुचाकीसह मोले चेकनाक्यावर गस्त घालण्यासाठी असलेल्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. कुळे पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीची गाडी जप्त करण्यात आली आहे. रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, एका महिलेची बनावट छायाचित्राद्वारे बदनामी केल्‍याप्रकरणी सायबर गुन्हा पोलिस विभागाने आज दीपक दलवाई (रा. कर्नाटक) याला अटक केली आहे. अश्लील वेबसाईटवर त्‍याने पीडित महिलेचा चेहरा दुसऱ्या महिलेला संगणकाद्वारे जोडला होता. तसेच तिच्‍या नावाने बनावट इन्‍स्टाग्राम अकाउंट तयार करून मॉर्फ केलेले फोटो व्‍हायरल केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Fire Safety Training In Goa
 Anmod Forest Murder Case
Jan Dhan Accounts In Goa
Goa Water Metro
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com