Ponda Police Station: वरिष्ठ अधिकाऱ्याशी गैरवर्तणूक, IRB च्या दोन पोलिस कॉनस्टेबलांना अटक

सिव्हिल सर्व्हिसचे वरिष्ठ अधिकारी अजय गावडे यांना मारहाण केल्याची घटना घडली.
Ponda Police Station
Ponda Police StationDainik Gomantak
Published on
Updated on

IRB पोलीस कॉन्स्टेबल हेरंब वेलिंगकर (वय 30) आणि त्यांचा भाऊ अनुप वेलिंगकर (वय 29) यांनी गोवा सिव्हिल सर्व्हिसचे वरिष्ठ अधिकारी अजय गावडे यांना मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली.

अजय गावडे हे त्यांची ड्युटी बजावत असताना या दोन्ही भावांनी वेलिंग जंक्शन,म्हार्दोळ येथे गावडे यांना रोखून मारहाण केली. तसेच त्यांनी गावडे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

तर हेरंब वेलिंगकर आणि अनुप वेलिंगकर हे दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याची नागरी सेवा अधिकारी अजय गावडे यांनी माहिती दिली. त्या दोघांनाही गैरवर्तणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Margao platform fight incident
Bison Attack Death Betoda Goa
Goa Dinesh Gawade Death Case
Goa road rage incident
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com