मालभाट मशीद मारहाण प्रकरणी सात जणांना अटक, जामीनावर सुटका

पहिल्यांदा दोन गटात मस्जिदीच्या आवारात बाचाबाची झाली होती
two groups clashed at a mosque in malbhat
two groups clashed at a mosque in malbhat Dainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा : मागील दोन दिवसापूर्वी मालभाट येथील जामिया मस्जिद येथे झालेल्या कथित हल्ला प्रकरणी आणखी सात जणांवर मडगाव (Margao) पोलिसांनी गुन्हा नोंद करून अटक केली आहे. नंतर त्यांना जामीनावर मुक्त केले.

या प्रकरणी सलीम शेख यांनी पोलीस स्थानकात सात जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यात अस्लम शेख, कादर शहा, महंमद अली, मैनुद्दीन शेख, हुसेन, जावेद, अतिक बंदूकडा यांचा समावेश आहे

two groups clashed at a mosque in malbhat
फोंड्यातील 'हा' महत्वपूर्ण प्रकल्प पूर्ण

तक्रारीत असे नमूद करण्यात आले आहे की वरील सर्वांनी इतरांच्या सहाय्याने दुसऱ्या गटावर बेकायदेशीर जमाव करून शिवीगाळ, मारहाण आणि हत्यारांनी हल्ला केला होता. हे प्रकरण एक एप्रिल रोजी घडले होते. यावेळी पहिल्यांदा दोन गटात मस्जिदीच्या आवारात बाचाबाची झाली होती त्यानंतर अस्लम शेख आणि मैनु शेख यांच्यावर मस्जिदीबाहेर हल्ला चढवण्यात आला होता. या प्रकरणात इतर काहीजणांचा समावेश असल्याचे ही नमूद करण्यात आले आहे. त्या विषयी पोलिसांकडून (police) तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

CM Pramod Sawant Inquiry Order
goa crime branch busts two fake call centers
Goa Mandovi River Casino Dispute
Goa Karnataka Border Conflict 2026:
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com