व्हिडिओ लाईक करण्याचे काम आणि गोव्यात सुट्टीचे आमिष दाखवून दोघांना 1 लाख 63 हजारांचा गंडा

इंदिरापुरम पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हिडिओ लाईक करण्याचे काम आणि गोव्यात सुट्टीचे आमिष दाखवून दोघांना 1 लाख 63 हजारांचा गंडा
Dainik Gomantak
Published on
Updated on

UP Online Fraud: व्हिडिओ लाईक करण्याचे काम आणि गोव्यात सुट्टीचे आमिष दाखवून दोघांना 1 लाख 63 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. उत्तर प्रदेशातील इंदिरापुरम येथे ही घटना घडली.

इंदिरापुरम पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

एका प्रसिद्ध हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, आयुषी गर्ग या महिलेला व्हिडिओ लाईक करण्याचे काम तर, निमेशला गोव्यात सुट्टीचे आमिष दाखवून 1 लाख 63 हजार रुपयांची फसवणूक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुषीला 30 ऑक्टोबर रोजी फोनवर एक मेसेज आला होता, ज्यामध्ये तिला व्हिडिओ लाइक करून पैसे कमवण्याच्या नोकरीचे आमिष दिले होते.

आशिया नावाच्या मुलीने आयुषीला टेलिग्रामवर जॉईन केले, त्यात सर्व सदस्यांना वेगवेगळी कामे देण्यात आली. व्हिडिओ लाइक केल्याबद्दल त्याला कमिशनही देण्यात आले होते, परंतु काही काळानंतर प्रीपेड टास्कच्या बहाण्याने त्याच्याकडून 93 हजार रुपये हस्तांतरित करण्यात आले.

दुसऱ्या घटनेत शुभमकुमार शाहू यांच्या नावाने फोन आला. त्याला गोव्यात सुट्टीचे पॅकेज देण्यात आली. त्याच्याकडून ऑनलाइन पॅकेजच्या बहाण्याने 70 हजार रुपये हस्तांतरित करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी खात्यांमधून केलेल्या व्यवहारांचा तपशील मागवला आहे. बँकेचे तपशील आल्यानंतर पुढील कारवाई केला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com