Goa Accident: हेल्मेट न घातल्याने घात झाला; दोन अपघातात दोन युवक ठार, नेसाय व धडे सावर्डे येथील घटना

Goa Fatal Accident: अपघाती मृत्यू म्हणून मायणा - कुडतरी पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. पुढील पोलिस तपास चालू आहे.
Goa Accident: हेल्मेट न घातल्याने घात झाला; दोन अपघातात दोन युवक ठार, नेसाय व धडे सावर्डे येथील घटना
Goa AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Fatal Accident

मडगाव: नेसाय येथील आयडीसी जंक्शनजवळ झालेल्या स्वयं अपघातात आल्वितो तावरीस (२४) वर्षीय दुचाकी चालक घटनास्थळी ठार झाला. तर धडे-सावर्डेत ट्रक व दोन दुचाकी अपघातात युवक अश्वेत गावकर ठार झाला.

नेसाय येथे रविवारी रात्री बाराच्या सुमारास अपघाताची ही घटना घडली. मृत अल्वितो सांज जुझे दि अरियाल येथील रहिवासी असून तो व्हेस्पा दुचाकीवरून येत होता. एका कुंपणाला त्याने जोरदार धडक दिली. त्याने हेल्मेट घातले नव्हते. डोक्याला जबरदस्त मार लागला व अपघातस्थळीच त्याला मरण आले. अपघाती मृत्यू म्हणून मायणा - कुडतरी पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. पुढील पोलिस तपास चालू आहे.

Goa Accident: हेल्मेट न घातल्याने घात झाला; दोन अपघातात दोन युवक ठार, नेसाय व धडे सावर्डे येथील घटना
Goa Politics: भ्रष्टाचाराच्या कॅन्सरने पोखरलंय; सरदेसाईंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच डिवचलं

दुसरीकडे धडे सावर्डे येथे सकाळी ८.४५ वा. ट्रक व दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात भांडोळ सावर्डे येथील अश्वेत गावकर (२४) या युवकाचे जागीच निधन झाले. सावर्डे येथील धोकादायक वळणावर कुडचडेमार्गे एक ट्रक येत होता तर विरुध्द दिशेने आपल्या घरी जाण्यासाठी अश्वेत आपल्या दुचाकीवरून येत होता.

Goa Accident: हेल्मेट न घातल्याने घात झाला; दोन अपघातात दोन युवक ठार, नेसाय व धडे सावर्डे येथील घटना
Suleman Khan: 'माझा Encounter करण्याची धमकी, पोलिसांनीच सोडले हुबळीत, 12 जणांचा सहभाग'; फरार सुलेमानचा पहिला Video Viral

सदर धोकादायक वळणावर ट्रकच्या पाठीमागून ओव्हरटेक करून एक दुचाकीस्वार अचानक आल्याने त्याने सरळ धडक अश्वेत याच्या दुचाकीला धडक दिल्याने अश्वेत ट्रकच्या चाकाखाली गेल्याने तो जागीच ठार झाला. कुडचडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून गावकर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव जिल्हा हॉस्पिटलमध्ये पाठवून देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com