Community Project : आसगावमध्ये शेतीला प्रोत्साहनासाठी दोन सामुदायिक प्रकल्प

Community Project :बार्देश विभागीय कृषी कार्यालयाचा पुढाकार : ६०हून अधिक शेतकरी एकत्र; शेतीचा वारसा पुढे नेणार
Community
Community Dainik Gomantak

Community Project :

म्हापसा, बार्देश तालुक्यात सामुदायिक शेतीला चालना देण्याच्या उद्देशाने बार्देश विभागीय कृषी कार्यालयाने गावातील भटक्या गुरांमुळे निर्माण झालेल्या धोक्यामुळे शेती थांबवलेल्या शेतकऱ्यांना कुंपण (संरक्षण) देऊन आसगाव येथील १५ हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन सामुदायिक शेतीखाली आणली आहे.

बार्देश विभागीय कृषी अधिकारी संपत्ती धारगळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविला जात आहे.

आसगावात दोन मोठे सामुदायिक शेती प्रकल्प हाती घेऊन ते कार्यान्वित केले गेले आहेत. ज्यामध्ये ६०हून अधिक शेतकरी एकत्र आले आहेत. पूर्वजांचा शेतीचा वारसा पुढे नेण्याचा त्यांचा उद्देश आहे.

पहिल्या प्रकरणात हरीश सांवत यांच्या नेतृत्वाखाली रेडीसाल फार्मर युजर ग्रुपने सुमारे ३९ शेतकऱ्यांना एकत्र आणून सुमारे १.५२ लाख चौरस मीटर जमीन सामुदायिक शेतीखाली आणली आहे, जी १४ हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.

दुसरा शेतकरी गट मंगलदास सावंत यांच्या नेतृत्वाखालील आहे. जिथे सुमारे २४ शेतकऱ्यांना एकत्र येऊन ४.५ हेक्टरपेक्षा जास्त जमीन लागवडीखाली आणली आहे. गावात २००हून अधिक भटकी जनावरे असल्याने त्यांना अडचणींना सामना करावा लागत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.

Community
North Goa Court: मंत्री बाबूश आणि माविन यांच्‍या विरोधातील खटले उत्तर गोव्‍यातील न्‍यायालयात वर्ग

आम्ही आसगावात शेतकऱ्यांच्या सहकार्याने व सहभागाने दोन सामुदायिक प्रकल्प हाती घेतले आहेत. गेल्या १०-१५ वर्षांपासून गावातील जमीन भटक्या गुरांच्या समस्यांमुळे वापराविना पडून आहे. जेव्हा शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधला, तेव्हा राज्य सरकार सामुदायिक शेतीअंतर्गत ९० टक्के अनुदान देत असल्याने आम्ही शेतकऱ्यांना शेती करण्यास प्रोत्साहित केले.

- राहुल जौंदळे, बार्देशचे साहाय्यक कृषी अधिकारी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com