Goa Accident: दोनापावला येथे दोन कारचा अपघात; महिला किरकोळ जखमी

राज्यात अपघातांचे सत्र सुरुच
Accident At Dona Paula
Accident At Dona PaulaDainik Gomantak

Accident At Dona Paula: दोनापावला मणिपाल रुग्णालयाच्या समोरील मार्गावर दोन कारमध्ये अपघात झाला आहे. हा अपघात शनिवारी 11 वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातातील किरकोळ जखमी महिलेला मणिपाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Accident At Dona Paula
Goa Water Supply: धरण साठ्यात समाधानकारक वाढ

गुरुवारी सकाळी मणिपाल रुग्णालयासमोरील जंक्शनवर दोन कारमध्ये अपघात झाला. बलेनो कार जंक्शनवरुन वळण घेताना समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही कारचे नुकसान झाले.

अपघातात एक महिला किरकोळ जखमी झाली. महिलेवर मणिपाल रुग्णालयात उपचार करण्यात आले. या मार्गावर वाहने भरधाव जात असतात. त्यामुळे या जंक्शनवर अपघात होतात असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

राज्यात अपघाताच्या घटना सुरुच आहेत. शुक्रवारी म्हापसा पणजी महामार्गावर पर्वरी येथे खाजगी बस आणि इनोव्हा कार यांच्यात अपघात झाला. यात इनोव्हा कारचे नुकसान झाले. यात पाचजण किरकोळ जखमी झाले तर बसचालकावर बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी संशयिताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

Accident At Dona Paula
Flight To Goa: स्पाइसजेट सुरत -पुणे- गोवा विमानसेवा सुरु करणार, पुढच्या महिन्यात पहिले उड्डाण

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com