Goa Water Supply: धरण साठ्यात समाधानकारक वाढ

जलस्रोत खाते : साठे फुल्ल, वर्षभर पिण्यासाठी पुरेसे पाणी
Goa Water Supply:
Goa Water Supply:Dainik Gomantak

अनिल पाटील

Goa Water Supply: यंदाचा मान्सून अनियमित पडला असतानाही तो सरासरी इतका झाला आहे. राज्यातील धरण साठ्यामध्ये पिण्यासाठीचे वर्षभर पुरेल एवढे पाणी असून यातून शेतीच्या सिंचनासाठीही पुरवठा केला जाईल, अशी माहिती जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी दिली.

Goa Water Supply:
Goa Home science College: ‘अन्नाचा अपव्यय थांबवा’ राज्य सरकारचे आवाहन

यंदा उशिरा दाखल झालेल्या मान्सूनने जुलै महिन्यात हंगामातील 85 टक्के इतकी विक्रमी हजेरी लावली. त्यामुळे जुलैमध्ये धरणे भरण्याचा 67 वर्षाचा विक्रम पावसाने आणि धरण साठ्यांनी मोडला.२३ जून पासून पाऊस सुरू झाला आणि 28 जूनला पावसाने हंगामातला उच्चांक जोरदार हजेरी लावली.

परिणामी राज्यातील साळावली, चापोली, आमठाणे, पंचवाडी, गावणे ही सर्व सहाही धरणे वेळेत भरली. तसेच राज्याला पाणीपुरवठा करणाऱ्या तिळारी धरणात पुरेसा धरण साठा गोळा झाला आहे. जलस्त्रोत खात्याच्या मुख्य अभियंता बदामी म्हणाले की, येत्या वर्षभरात पिण्यासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या पाण्याची कसलीच टंचाई असणार नाही. याशिवाय, शेतीच्या सिंचनासाठीही पाणीपुरवठा केला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com