Ponda: रेल्वे तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणी दोघांना अटक; 2.5 लाखांची ई-तिकिटे जप्त

मडगावनंतर तीनच दिवसात रेल्वे पोलिसांची फोंड्यात कारवाई
Railway|Goa News
Railway|Goa NewsDainik Gomantak

Ponda: मडगावप्रमाणे फोंडा येथेही रेल्वेच्या तिकिटांचा काळा बाजार सुरू असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी फोंडा शहरातील एसएम टूर्स अँड ट्रॅव्हल्स या आस्थापनावर धाड घालून दोघांना अटक केली आहे. गौतम सैल आणि मयुर गावकर अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. आरपीएफचे निरिक्षक विनोद मिश्रा यांनी ही कारवाई केली.

Railway|Goa News
Schedule Tribe Reservation: गोव्यात ‘एसटीं’ना राजकीय आरक्षण नसणे दुर्दैवी; किमान 5 जागा आवश्यक

दरम्यान, या छाप्यात 2 लाख 60 हजार रुपये किंमतीची ई तिकिटे जप्त केली. बनावट ओळखपत्रे वापरून रेल्वेची ई-तिकिटे खरेदी करून ती चढ्या भावाने ग्राहकांना विकण्याचे काम हे टुर एजंट करत होते.

9 जानेवारी रोजी रेल्वे सुरक्षा दलाने मडगावातील एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स दुकानावर छापा टाकला होता. अनेक महिन्यांपासून रेल्वे सिस्टमवरून तिकिट लगेच संपत असल्याच्या तक्रारी होत्या. दरम्यान, संबधित अधिकांऱ्यांना रेल्वे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. यावरून रविवारी मडगाव येथील ईएसआय हॉस्पिटलजवळील फातिमा टूर्स अँड ट्रॅव्हल्स दुकानावर मडगावच्या रेल्वे सुरक्षा दलाने छापेमारी केली. या छाप्यात रेल्वे प्रवासासाठी वापरण्यात येणाऱ्या 62 बनावट ओळखपत्रांसह ईतर कागदपत्रे जप्त केली होती. या ओळखपत्रांच्या माध्यमातून रेल्वे तिकिट बुकिंग केले जात होते.

Railway|Goa News
Mahadayi Water Dispute: म्हादईप्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या साखळी गावातील मेगा रॅलीला परवानगी नाकारली...

मडगावमधील कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त केली आहेत. फातिमा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक संशयित तजुद्दीन कादर (32) याच्यासह हंसराज म. वाघेला (20) याला अटक केली. या दोघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तसेच संशयितांकडून जप्त केलेल्या रेल्वे तिकिटांची किंमत एकंदरीत 3 लाख 20 हजार रुपये होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com