

राज्यातील अपघातांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच म्हापसातील टॅक्सी स्टँडजवळ टाटा ट्रक आणि मारुती सुझुकी यांच्यात आज (27 नोव्हेंबर) धडक झाली. परिणामी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
उपलब्ध माहितीनुसार, मन्सूर मोबाइल एंटरप्रायझेसजवळील चौकात लाल सिग्नलच्या वेळी टाटा ट्रक (रजि. क्र. GA 07 T 0279) आणि मारुती सुझुकी XL6 (रजि. क्र. GA 03 Z 9802) यांची टक्कर झाल्याने एकच गोंधळ उडाला. कार वेगात असल्यामुळे ही धडक झाली असल्याचा आरोप ट्रक चालकाने केला आहे.
दरम्यान, अपघात होऊन बराच वेळ उलटला तरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले नसल्याचे मत प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केले. म्हापसा टॅक्सी स्टँडजवळील ट्रॅफिक सिग्नलच्या बिघाडामुळे हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येते.
सदर अपघातामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे तिथेच कदंबा बस आणि ह्युंडाई I20 यांची एकमेकांशी टक्कर झाली. त्यामुळे आधीच निर्माण झालेल्या गोंधळात आणखीच भर पडली. या सर्व प्रकारामुळे इतर वाहनचालकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला.
सदर घटनांचे प्रमाण वाढल्याने वाहतूक आणि रस्ता सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.