39 व्हिला, स्विमिंग पूलची परवानगी रद्द करा, तुये ग्रामसभेत मागणी; आयटी कन्व्हेन्शन सेंटर आणि कचरा प्रकल्पाला कडाडून विरोध

Commercial Projects Opposition Tuyem Panchayat: पंचायत क्षेत्रात वाढत्या व्यावसायिक प्रकल्पांमुळे पर्यावरण, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधांवर ताण येण्याची शक्यता व्यक्त करत तुये ग्रामसभेने रविवारी अनेक महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर केले.
Commercial Projects Opposition Tuyem Panchayat
Commercial Projects Opposition Tuyem PanchayatDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पेडणे: पंचायत क्षेत्रात वाढत्या व्यावसायिक प्रकल्पांमुळे पर्यावरण, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधांवर ताण येण्याची शक्यता व्यक्त करत तुये ग्रामसभेने रविवारी अनेक महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर केले. यामध्ये ३९ व्हिला आणि ३९ स्विमिंग पूल उभारण्यासाठी दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी, प्रस्तावित आंतरराष्ट्रीय आयटी कन्व्हेन्शन सेंटर तसेच बांधकाम व पाडकामातील कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला विरोध करण्याच्या ठरावांचा समावेश आहे.

सरपंच अनिता साळगावकर अनुपस्थित असल्याने उपसरपंच मनोहर पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. यावेणी पंच सुलक्षा नाईक उपस्थित होत्या. पंचायत सदस्य अनिल हरमलकर मात्र ग्रामस्थांमध्ये बसले होते. सात सदस्यांपैकी केवळ तीन सदस्य उपस्थित होते. गावातील पाण्याची उपलब्धता, पर्यावरणीय समतोल आणि पायाभूत सुविधांची क्षमता विचारात न घेता नव्या व्यावसायिक प्रकल्पांना मंजुरी देऊ नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली. गावाचा सर्वंकष वाहतूक क्षमता अहवाल तयार होईपर्यंत कोणत्याही नव्या व्यावसायिक प्रकल्पाला ग्रामपंचायतीने परवानगी देऊ नये, असा ठरावही मंजूर करण्यात आला.

Commercial Projects Opposition Tuyem Panchayat
Goa Police: इशारे आणि पोकळ डरकाळ्यांनी शिस्त येणार का? गोवा पोलिसातील ढासळत्या शिस्तीवर परखड भाष्य

विविध विषयांवर चर्चा

वाढत्या बांधकामांमुळे पाणीटंचाई, वाहतूक कोंडी आणि पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. तसेच गोवा (Goa) औद्योगिक विकास महामंडळाने (आयडीसी) संपादित केलेली; परंतु सध्या वापराविना पडून असलेली जमीन मूळ मालकांना परत करावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, महत्त्वाच्या विषयांवर ग्रामपंचायत आपल्याला विश्वासात घेत नसल्याचा आरोप पंचायत सदस्य अनिल हरमलकर यांनी केला. त्यामुळे ग्रामपंचायतीतील अंतर्गत मतभेदही ग्रामसभेत समोर आले. गावाचा विकास व्हावा; मात्र तो स्थानिकांच्या हिताला बाधा न आणता आणि पर्यावरणाचा समतोल राखून व्हावा, अशी भूमिका ग्रामस्थांनी ठरावांद्वारे स्पष्ट केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.