Goa Liberation War: गोव्याच्या मुक्ती लढ्याचा रंजक इतिहास नाटकातून उलगडणार...35 कलाकारांचा सहभाग

मराठी अ गट नाट्य स्पर्धेत विकास मंच सोशल क्लब ब्रम्हाकरमळीतर्फे ८ रोजी सादरीकरण होणार
Goa Liberation War | Marathi Drama Competition
Goa Liberation War | Marathi Drama CompetitionDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पद्माकर केळकर

गोव्याच्या मुक्ती लढ्यात सत्तरी तालुक्यातील असंख्य स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान लाभलेले आहे. सत्तरी तालुक्यात धावे गावातून पोर्तुगीजांविरोधात पहिली क्रांतीकारी चळवळ सुरु झाली होती. त्या सर्व घटनेचा उलगडा नाटकातून दाखविणाचा प्रयत्न होणार आहे.

नगरगाव येथील शिक्षक संजीव बर्वे यांनी दोन अंकी 'तुळशीपत्र' या मराठी सत्यघटने वरील नाटकाचे लेखन केलेले आहे. या नाटकात बर्वे यांनी सत्तरी तालुक्यातील क्रांतीकारक स्वातंत्र्य सैनिक कोण कोण होते. त्याची माहीती नावे संकलन करुन त्याच स्वातंत्र्य सैनिकांची नावांची व्यक्तीरेखा कलाकारांना दिलेली आहे.

Goa Liberation War | Marathi Drama Competition
Goa Beach: पर्यटनासाठी गोव्यात येताय? तर मग जाणून घ्या या समुद्रकिनाऱ्यांचे वैशिष्ट

कला अकादमी गोवा आयोजित ५६ व्या अ गट मराठी नाट्य स्पर्धेत ब्रम्हाकरमळी विकास मंच सोशल क्लब यांच्या वतीने तुळशीपत्र नाटकाचे सादरीकरण शुक्रवार ८ डिसेंबर रोजी साखळी रविंद्र भवनात सायंकाळी ७ वाजता होणार आहे.

दिग्दर्शन कोमेडी नाट्य कलाकार म्हणून ओळख बनविलेले प्रविण मराठे करीत असून नाटकाची तालीम ब्रम्हाकरमळी ब्रम्हदेव देवस्थानात सुरु आहे. दिग्दर्शक प्रविण मराठेंनी बर्वेंनी लेखन केलेला अगदी क्रांतीकारी इतिहासाचा बारकाईने अभ्यास करुन कलाकारांना स्वातंत्र्य सैनिकांच्या रुपांनी घडविणाचा प्रयत्न होणार आहे.

नाटकात नगरगाव पंचायत क्षेत्रातील विविध गावातील तब्बल ३५ कलाकार असून पोर्तुगीज सरकारवेळी ग्रामीण भागातील लोकांचे रहाणीमान, संघर्ष रंगमंचाच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न असेल.

गोवा मुक्ती लढ्यात त्याकाळी जीवाची, कुटुंबांची पर्वा न करता अनेक सत्तरीतील स्वातंत्र्य सैनिकांनी अगदी संकटांचा सामना करीत लढा दिला होता. धावे गावातून क्रांतीची पहिली मशाल प्रज्वलित केली होती. हा सर्व इतिहास त्याच स्वातंत्र्य सैनिकांच्या रुपाने आताच्या पिढीला होण्यासाठी आपण या तुळशीपत्र नाटकाचे लेखन केलेले आहे. त्या नाटकाचा आस्वाद जरुर घ्यावा.

संजीव बर्वे (नगरगाव, लेखक)

आपल्या लोकांचे जीवन त्याकाळी खडतर बनले होते. पोर्तुगीजांच्या जाचक अत्याचाराला लोक बळी पडले होते. यातून सुटका होण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी पोर्तुगीजां विरोधात आवाज उठविण्याचा धाडसी प्रयत्न त्याकाळी केला होता. त्याचे लेखन संजीव बर्वेंनी फारच सुंदर केलेले आहे. व साक्षात क्रांतीकारी इतिहासच तुळशीपत्र नाटक लेखनातून प्रकट केला आहे.

प्रविण मराठे.(बांबर, दिग्दर्शक)

साखळी रविंद्र भवनात ८ रोजी तुळशीपत्र हे नाटक नवीन पिढीला चांगली दिशा देणारे नक्कीच ठरणार आहे. नगरगाव पंचायत भागातील युवकांनी एकत्र येऊन नाटकात सहभाग घेतला आहे. तो वाखाण्यजोगा आहे. तब्बल ३५ कलाकारांचा संच म्हणजे क्रांतीकारी पर्वणीच असून नगरगाव पंचायतीसाठी ही अभिमानाची गोष्ट बनलेली आहे.

संध्या खाडीलकर(नगरगाव सरपंच)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Lakshmi Narayanan Rajyog Benefits 2026
donald trump mojtaba khamenei
AI Chatbot False Intelligence Report US China War
US Iran War End Donald Trump Peace Deal Statement
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com