Goa: तुळशी विवाह ही दुसरी मोठी दिवाळी

तुळशीविवाह साजरा करण्यासाठी गोमंतकीयांची जोरदार तयारी सुरू आहे.
तुळशी रंगकाम‌ करताना चिमूकल्या.
तुळशी रंगकाम‌ करताना चिमूकल्या.Dainik Gomantak

दाबोळी: गोवा राज्यात तुळशी विवाहाला मोठी दिवाळी (Diwali) असे संबोधले जाते. लहानपणापासून राज्यात नजर मारल्यावर मंदिराबाहेर असणाऱ्या तुळशी वृंदावनासमोर व प्रत्येक घराबाहेर असणाऱ्या तुळशी वृंदावनासमोर लोक तुळशीवृंदावनाची साफसफाई करणे व रंगरंगोटी करताना दृष्टीस पडत आहेत. अबालवृध्दा बरोबर चिमूकल्यांचेही हात रंगकामात थिरकले.

थोरासांठी हा सण (Festival) उत्साह व आनंद देणारा गणला जातो. सध्या संपूर्ण नवीन रंग चढविण्यासाठी पॉलीश कागदाने पूर्वीचा रंग घासून गुळगुळीत करणे, नवीन रंग चढविणे कामे जोरात सुरू आहेत. रंगकाम करणारे कलाकार पूर्णता या कामात मग्न आहेत.त्यांच्या बरोबर चिमूकली मंडळीही मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहे.

तुळशी रंगकाम‌ करताना चिमूकल्या.
कामगार सेनेच्या आंदोलनामुळे दाबोळी विमानतळावर प्रवाशांचे हाल

गोवा राज्यात हा तुळशीविवाह सण व्दादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी लावण्याची प्रथा बनली आहे. पण संस्कृती प्रेमी व मंदिराबाहेरील (temple) तुळशीवृंदावनासमोर हा सण प्रबोधिनी एकादशी दिवशीच साजरा करतात. बहुतेक मंदिराबाहेर असणाऱ्या तुळशीवृंदावनाला रंगकाम झाले असून, बांबू व इतर वस्तू लावून आरास सजावट करण्याचे काम सुरू झाले आहे.

तसेच, काही ठिकाणी या आरास सजावटीला सुपारी कात्रे, केळीचे घड, नारळ पेंडी, अननस, पेरू, चिकू, सफरचंद, आंबा आदी फळे बांधतात व आरत्या झाल्यावर त्या वस्तूंची पावणी करतात. त्यामुळे फळफळावळ जमविण्यासाठी लोक विविध बाजारात शोधाशोध करीत आहेत.गोवा राज्यात काही ठिकाणी हा समारंभ एकादशीला तर काही ठिकाणी व्दादशीला करतात.

तसेच, तुलसी विवाहाला (marriage) लागणारे साहित्य उदाहरणार्थ ऊस, चिंच / आवळा फांदी, चुरमुरे, पोहे, लाह्या, जोडवी, कापूर, हळद पुड आदी ठिकठिकाणच्या बाजारात उपलब्ध झाले असून लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करू लागले आहेत. एकूणच तुळशीविवाह साजरा करण्यासाठी गोमंतकीयांची जोरदार तयारी सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com