Goa Accident: ट्रकला बांधून चालकाला अमानुष मारहाण; अपघातानंतर कुर्टीत संतप्त जमावाने कायदा घेतला हातात

Ponda Accident: अपघातानंतर काहीजण हे प्रकरण मिटवण्यासाठी वाटाघाटी करत होते. पण, जमाव अचानक संतप्त झाला.
Curti, Ponda Accident: ट्रकला बांधून चालकाला अमानुष मारहाण; अपघातानंतर कुर्टीत संतप्त जमावाने कायदा घेतला हातात
Curti, Ponda AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Accident

फोंडा: अपघातानंतर ट्रक चालकाला त्याच्याच ट्रकच्या समोर बांधून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना कुर्टी- फोंडा येथे उघडकीस आलीय. ट्रकने कारला धडक दिल्यानंतर गुरुवारी (०९ जानेवारी) रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी ट्रक वाहतूक संघटनेने या घटनेचा निषेध केला असून, याप्रकरणी फोंडा पोलिसांकडे तक्रार दाखल केलीय.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कुर्टी फोंडा येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास एक अपघाताची घटना उघडकीस आली. ट्रकने कारला धडक दिल्याने अपघात झाला. कार उसगावातून फोंड्याच्या दिशेने जात होती. या अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक चालकाला ताब्यात घेऊन मारहाण सुरु केली. एवढेच नव्हे तर जमावाने चालकाला त्याच्याच ट्रकच्या समोर बांधून अमानुष मारहाण केली.

Curti, Ponda Accident: ट्रकला बांधून चालकाला अमानुष मारहाण; अपघातानंतर कुर्टीत संतप्त जमावाने कायदा घेतला हातात
Goa's future : गोव्याच्या भविष्याबद्दल आता 'गंभीर' होणे गरजेचे! माजी आमदारांनी पिळले सरकारचे कान

या मारहाणीत ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय. या घटनेचा ट्रक वाहतूक संघटनेने निषेध नोंदवला आहे. अपघातानंतर काहीजण हे प्रकरण मिटवण्यासाठी वाटाघाटी करत होते. पण, जमाव अचानक संतप्त झाला आणि त्यांनी ट्रक चालकाला मारहण करण्यास सुरुवात केली, अशी माहिती समोर आलीय.

Curti, Ponda Accident: ट्रकला बांधून चालकाला अमानुष मारहाण; अपघातानंतर कुर्टीत संतप्त जमावाने कायदा घेतला हातात
Goa Crime: कळंगुटमध्ये तोतया FDA अधिकाऱ्याचा उच्छाद, अन्न व्यवसायिकांना देतोय धमकी; मंत्री राणेंनी दिली माहिती

दरम्यान, याप्रकरणी ट्रक वाहतूक संघटनेने फोंडा पोलिसांत तक्रार दाखल केलीय. संघटनेने जमावाने केलेल्या कृत्याचा निषेध करताना, भागातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याची खंत देखील व्यक्त केली. फोंडा पोलिस प्रकरणाचा अधिक तपास करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com