Goa's future : गोव्याच्या भविष्याबद्दल आता 'गंभीर' होणे गरजेचे! माजी आमदारांनी पिळले सरकारचे कान

Ferdino Rebello: माजी आमदारांनी सरकारला म्हादई, पर्यावरण, खाण, कॅसिनो आदी विषयांवरून सरकारला धारेवर धरले. प्रत्येकाने गोव्याच्या भविष्याबद्दल आता गंभीर होणे गरजेचे आहे.
Ferdino Rebello About Goa
Ferdino Rebello On GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Ferdino Rebello About Goa

पणजी: गोव्यात मूळ गोमंतकीय किती आहेत? ज्या गावात शंभर ते दीडशे घरे असायची तेथे १०० ते १५० प्लॉट मारून विकले जात आहेत. ‘दिल्ली ले लिया, अब गोवा भी लेंगे’, असे बोलले जातेय. याचसाठी आम्ही पोर्तुगीजांविरूद्ध लढलो होतो का? जनमत कौल जिंकून गोवा स्वतंत्र याचसाठी आम्ही ठेवला होता का? असा प्रश्‍न माजी आमदार तथा निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनी विचारला.

दरम्यान, रिबेलो म्हणाले, २०४६ पर्यंत २४ टीएमसी पाणी गोव्याला मिळेल परंतु या पाण्यासाठी ५९ प्रकल्प उभारावे लागतील. जर या पाण्याचा योग्य विनिमय झाले नाही तर पुन्हा म्हादईच्या पाण्याचे वाटप २०४६ साली होईल, त्यामुळे यावर गांभिर्याने विचार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. गोवा पर्यावरण, जैवविविधता, समुद्रपातळीची होणारी वाढ यावर गांभिर्याने विचार करत नाही आहे. पणजीत दिवसाला पंधरा मिनिटे पाणी येत नाही आणि आम्ही स्वयंपूर्णतेवर बोलतो आहोत. हे कितपत योग्य आहे. प्रत्येकाने गोव्याच्या भविष्याबद्दल आता गंभीर होणे गरजेचे आहे.

Ferdino Rebello About Goa
Goa Tourism: थोडा है, थोडे की जरुरत है! गोव्याच्या पर्यटनावर कोल्हापुरच्या पर्यटकाने मांडले रोखठोक मत

सरकार म्हादईवर बोलते एक, वागते दुसरेच!

दरम्यान, माजी आमदारांनी सरकारला म्हादई, पर्यावरण, खाण, कॅसिनो आदी विषयांवरून सरकारला धारेवर धरले. सरकार म्हादईसंबंधी बोलते एक आणि वागते दुसरेच, असा आरोप त्यांनी यावेळी केले. गोव्यात लैंगिक व्याभिचाराचे सर्रास फलक लावले जात आहेत. याबाबत आपण कोणी जाब विचारणार आहात की नाही, असा जाब माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप यांनी विचारला. माजी आमदार फेर्दिन फुतार्दो यांनी राजधानी पणजीत रात्री ११ नंतर नेमके काय चालते ? याबाबत जाब विचारला, सरकारवर घाणाघाती टीका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com