Goa Politics: मंत्री, आमदारांवर नियंत्रणासाठीच कर्मचारी निवड आयोग तृणमूलचा आरोप

सरकारात आपले स्थान धोक्यात येऊ नये, यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून खटपटी सुरू आहेत.
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सरकारात आपले स्थान धोक्यात येऊ नये, यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून खटपटी सुरू आहेत. आता सरकारातील मंत्री आणि आमदारांवर नियंत्रण ठेवून आपले वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी ‘कर्मचारी निवड आयोग’ लागू करून भविष्यात होणारी सरकारी नोकर भरती आयोगामार्फत करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

(Trinamool accuses Staff Selection Commission to control ministers and MLAs in goa)

CM Pramod Sawant
Goa News: राज्य कर्मचारी निवड आयोगाचे भवितव्‍य विरोधामुळे अधांतरी

रोजगाबाबत सरकार खरोखरच गंभीर असेल तर रोजगार धोरणासंदर्भात श्‍वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे प्रसार माध्यम समन्वयक ट्रोजन डिमेलो यांनी केली.

पणजी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे अनुसूचित जाती आणि जमातीचे समन्वयक संतोष मांद्रेकर आणि प्रवक्त्या ॲना ग्रासियस उपस्थित होत्या. 2017 मध्ये भाजप सरकारने गोमंतकीयांना 50 हजारांहून अधिक नोकऱ्या देण्याचे आश्‍वासन दिले होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी देखील 10 हजार नोकऱ्यांचे आश्‍वासन वारंवार दिले आहे. परंतु घुमजाव करण्याचा भाजपचा वारसा डॉ. सावंत यांनी पुढे नेऊन गोमंतकीय जनतेची फसवणूक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com