Har Ghar Tiranga: राज्यात एक लाख घरांवर फडकणार 'तिरंगा'

Goa Independance Day: ११, १२ व १३ ऑगस्ट रोजी सर्व विधानसभा मतदारसंघात तिरंगा दुचाकी यात्रा
Goa Independance Day: ११, १२ व १३ ऑगस्ट रोजी सर्व विधानसभा मतदारसंघात तिरंगा दुचाकी यात्रा
Har Ghar Tiranga| PM ModiDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: १५ ऑगस्ट रोजी राज्यातील एक लाख घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार आहे. त्याआधी जनजागृतीसाठी मतदारसंघवार भारतीय जनता युवा मोर्चा दुचाकी फेऱ्या काढेल, अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश सचिव दयानंद सोपटे व सर्वानंद भगत होते.

ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत काळानिमित्त प्रत्येक घरावर तिरंगा फडकावण्याचे आवाहन केले आहे. भाजप पक्ष संघटनेकडून हा विषय कार्यकर्ते व जनतेपर्यंत पोचवला जात आहे. जनतेच्या सहभागातून हा कार्यक्रम राज्यभरात राबवला जाणार आहे. ११, १२ व १३ ऑगस्ट रोजी सर्व विधानसभा मतदारसंघात तिरंगा दुचाकी यात्रा काढण्यात येतील.

Goa Independance Day: ११, १२ व १३ ऑगस्ट रोजी सर्व विधानसभा मतदारसंघात तिरंगा दुचाकी यात्रा
Har Ghar Tiranga: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे नागरिकांना खास आवाहन

या काळात मतदारसंघवार स्वातंत्र्यसैनिकांचा गौरव, गोवा मुक्तीची स्मारके व ऐतिहासिक ठिकाणांची साफसफाई करण्यात येणार आहे. १४ ऑगस्ट रोजी देश विभाजन स्मृती दिनानिमित्त देशाची फाळणी झाल्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोचवण्यासठी म्‍हापसा व मडगावात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तेथे मूक फेऱ्याही काढल्या जातील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com