पणजी : कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी गेल्या कार्यकाळात आदिवासी खात्याचा कारभार चांगल्या पद्धतीने सांभाळला होता.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आदिवासी कल्याण खात्याचा कार्यभार मंत्री गावडे यांच्याकडे द्यावा, अशी मागणी युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्स (‘उटा’)चे प्रकाश वेळीप यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी संघटनेचे सतीश वेळीप आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. (Tribal Welfare Department should be handed over to Minister Gawde Prakash Velip said)
मंत्री गावडे यांनी यापूर्वी आदिवासी कल्याण मंत्री म्हणून कामकाज पाहिले आहे. त्यांच्या कार्यकाळात समाजाचे काही प्रलंबित प्रश्न मार्गी लागले. म्हणून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मंत्री गावडे यांच्याकडे आदिवासी खाते सोपवावे, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.
25 रोजी प्रेरणा दिन सोहळा
‘उटा’तर्फे 25 मे हा 'प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, आमदार गणेश गावकर उपस्थित राहणार आहेत,असे प्रकाश वेळीप यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.