Camurlim: ..परवाना नाही, तरीही झाडे तोडली! कामुर्ली ग्रामसभा तापली; सरपंचांचा FIRचा इशारा

Camurlim Tree Cutting: ग्रामस्थ सीताराम सातार्डेकर यांनी प्रश्न उपस्थित केला की, जर परवाना रद्द झाला असेल, तर झाडे तोडण्याची परवानगी कोणी व कशी दिली?
Tree Cutting
Tree CuttingDainik Gomantak
Published on
Updated on

बार्देश: मागील ग्रामसभेत ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंचायतीने कामुर्ली चर्चजवळील गृहबांधणी परवाना मागे घेणार, असे आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन फोल ठरत असून सध्या त्या ठिकाणी शेड उभारून झाडांची कत्तल सुरू आहे. याबाबत माजी सरपंच शरद गाड व ग्रामस्‍थ चंद्रनाथ रावळ यांनी या ग्रामसभेत नाराजी व्‍यक्त केली.

ग्रामस्थ सीताराम सातार्डेकर यांनी प्रश्न उपस्थित केला की, जर परवाना रद्द झाला असेल, तर झाडे तोडण्याची परवानगी कोणी व कशी दिली? यावर सरपंच नाईक म्हणाले की, घरे बांधणीचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तो पुन्हा देण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. सरपंचांची परवानगी न घेता, मागील सचिवांनी आपल्या मर्जीनुसार परवाना दिला असल्यास, ग्रामस्थांनी आरटीआयअंतर्गत अर्ज करावा; त्यातून सर्व माहिती स्पष्ट होईल.

Tree Cutting
Camurlim Illegal Construction: 'ते' बांधकाम बेकायदाच! हायकोर्टाचे शिक्कामोर्तब; कामुर्लीतील बांधकाम पाडण्याचे आदेश

काम सुरू केल्यास संबंधित ठेकेदारावर एफआयआर दाखल करण्यात येईल व या प्रकरणाची माहिती पंचायत संचालनालय, बीडीओ कार्यालयाला दिली जाईल. तसेच सचिवांनी परस्पर परवानगी दिली असेल तर पंचायत कायद्यानुसार कारवाई केली जाईल.

Tree Cutting
Camurlim Crime: मैत्रिणीला भेटायला आलेल्या मुलाला लाथाबुक्यांनी मारहाण; कामुर्ली परिसरात खळबळ

गावाच्‍या विकासावरही झाली चर्चा

ग्रामसभेत गावाच्या विकासावरही चर्चा झाली. सध्या गावाचा विकास रखडला असून त्यावर पंचायतीने लक्ष द्यावे, असे सायमन लोबो यांनी सांगितले. कायद्याच्या चौकटीत राहूनच कामे करा, कायद्याबाहेर जाऊ नका, असा इशाराही त्‍यांनी दिला. तर, ए. डिकॉस्टा यांनी श्री सातेरी देवस्थान ते गाडा रस्ता खड्डेमय झाला असून, त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी अशी मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com