Goa Special Students : गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने, दिव्यांग मुलांना समान शैक्षणिक संधी सुनिश्चित करण्यासाठी शाळांना एक परिपत्रक जारी केले आहे. गोवा बोर्डाने, गोवा राज्य दिव्यांग व्यक्तींच्या आयोगाच्या (CwDs) शिफारशीनंतर, दिव्यांग व्यक्तींच्या हक्क कायद्याच्या कलम 16 (i) नुसार, कोणत्याही दिव्यांग मुलाला प्रवेश न नाकारण्याची सूचना शाळांना देण्यात आली आहे.
हे परिपत्रक तत्काळ प्रभावाने जारी करण्यात आले असून त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुलभ हाच त्यामागील हेतू आहे. वारंवार सूचना देऊनही, दिव्यांग विद्यार्थ्यांना काही विशिष्ट परिस्थितीत प्रवेश नाकारण्यात आल्याची उदाहरणे समोर आली आहेत, ज्यामुळे हे परिपत्रक जारी करण्यात आले.
सामान्य विज्ञान किंवा सुधारित विज्ञान स्वीकारणारी मुले इयत्ता अकरावीत विज्ञानाची निवड करू शकणार नाहीत आणि नवीन गणिते किंवा सुधारित गणिते स्वीकारणारी मुले गणितासाठी निवड करू शकणार नाहीत, हे मुद्दे परिपत्रकातून खोडून काढण्यात आले आहेत. कारण या निर्बंधांमुळे अपंग विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छित अभ्यासक्रमासाठी अडथळे निर्माण होत होते.
आयोगाने भर दिला की गोवा बोर्डाने जारी केलेले परिपत्रक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक सेटअप प्रदान करण्याच्या उद्देशाने आहे.
याबाबत राज्याचे दिव्यांग आयुक्त गुरुप्रसाद पावसकर म्हणाले की, आम्हाला आशा आहे की या परिपत्रकामुळे शाळांना अपंग विद्यार्थ्यांबद्दल अधिक संवेदनशील आणि सामावून घेण्यास प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना त्यांच्या शैक्षणिक आवडींचा सन्मानाने पाठपुरावा करण्यात मदत होईल.
आयोगाने शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांना या कायद्याच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आयोगाला आशा आहे की सर्व शैक्षणिक संस्था दिव्यांग विद्यार्थ्यांना अडथळामुक्त शैक्षणिक वातावरण प्रदान करतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.