Goa Environment: ..तर भविष्यात गोव्यात बर्फ देखील पडेल; हरित परिषदेत वाहतूकमंत्र्याचे वक्तव्य

Goa: वाहतूकमंत्री गुदिन्होंच्या हस्ते दोना पावला येथे हरित गुंतवणूक परिषदेचे उद्‍घाटन
Green Investment Council
Green Investment Council Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa: जगात हवामानात बदल होत असून आत्तापासून अक्षय ऊर्जेला प्राधान्य देण्याची आवश्‍यकता आहे. हरित उद्योगात गुंतवणूक करून शाश्‍वत पद्धतीने, तसेच युवा आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून पुढे जाण्याची आवश्‍यकता आहे, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.

दोना पावला येथे असोचॅमद्वारे आयोजित हरित गुंतवणूक आणि शाश्‍वत परिषदेत ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. गुदिन्हो यांच्या हस्ते दोन दिवसीय परिषदेचे उद्‍घाटन झाले. यावेळी सोबत असोचॅमचे अध्यक्ष विनोद पांडे, असोचॅम गोवा विभागाचे सहअध्यक्ष सागर साळगावकर, सुधीर पाठक, मॉझ वसवडावाल, चाको जुझे, व इतर मान्यवर उपस्थित होते.

Green Investment Council
Manohar Parrikar: पर्रीकरांच्या नावे ‘युवा शास्त्रज्ञ पुरस्कार’

पूर्वी नोव्हेंबरमध्ये पाऊस पडत नव्हता, परंतु आत्ता डिसेंबरमध्येही पाऊस पडतो. भविष्यात गोव्यात बर्फ देखील पडेल. पर्यावरणाची काळजी न केल्यामुळे, निसर्ग आमच्यावर पलटवार करत आहे. अक्षय ऊर्जेचा वापर होणे आवश्‍यक आहे. अभ्यासक्रमात हरित क्रांती आणि त्याचे फायदे याचा समावेश करण्याची वेळ आली आहे. जागरूकता केल्यास हे शक्य होणार आहे, असे गुदिन्हो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com