म्हापसा : कोलवाळ कारागृहात गोवा मानव संसाधन विकास महामंडळाच्या एका सुरक्षा रक्षकाला 1.04 लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ बाळगल्याबद्दल अटक केली होती. या पार्श्वभूमीवर अशा घटना टाळण्यासाठी दर सहा महिन्यांनी कारागृहातील महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची बदली केली जाईल, असे गोवा मानव संसाधन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नारायण नावती यांनी स्पष्ट केले. (Transfer of officials in Colvale jail)
शुक्रवारी नारायण नावती यांच्यासह महाव्यवस्थापक (सुरक्षा) जॉन अगियार, वरिष्ठ सुरक्षा अधिकारी विजय गावस, व्यवहार अधिकारी नरेंद्र मयेकर यांनी कारागृहाला भेट दिली.
वरक याला पोलिस कोठडी : नावती म्हणाले की, त्या सुरक्षा रक्षकाला बडतर्फ करण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. त्याला सध्या राखीव ठेवले आहे. महामंडळ योग्य पोलिस पडताळणीनंतर सुरक्षा रक्षक आणि इतर पदांवर नियुक्ती करते. कोलवाळ पोलिसांनी संशयित संदेश वरक याला म्हापसा न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
आम्ही कारागृहातील सर्व कर्मचाऱ्यांची दर सहा महिन्यांनी बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. जर हे कर्मचारी सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ याच ठिकाणी तैनात असतील, तर त्यांना वाटते की ते तुरुंगातीलच कर्मचारी आहेत. म्हणून तुरुंगातील महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांची बदली करण्याचा आणि त्यांच्या जागी नवी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
- नारायण नावती, व्यवस्थापकीय संचालक, गोवा मानव संसाधन विकास महामंडळ
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.