डिचोलीत ट्राफिक जाम; डांबरीकरण काम सुरू

जवळपास दोन तास वाहतूक खोळंबल्याने नागरिक झाले त्रस्त
Traffic Jam Problem
Traffic Jam ProblemDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: डिचोली शहरात अधूनमधून वाहतूक कोंडीचे प्रकार घडत असतानाच काल सोमवारी सायंकाळी मोठा ‘चक्का जाम’ झाला. जवळपास दोन तास वाहतूक खोळंबल्याने नागरिक त्रस्त झाले.

डिचोलीत रस्त्यांचे डांबरीकरण काम सुरू आहे. शहरातील नवीन पुलाजवळ हॉटमिक्स डांबरीकरण काम सुरू असताना सायंकाळी पाचच्‍या सुमारास वाहतुकीची कोंडी झाली. सायंकाळची वेळ असल्याने नेहमीप्रमाणे रस्त्यावर अन्य वाहनांसह अवजड वाहनांची मोठी वर्दळ होती. क्षणार्धात दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नवीन आणि जुन्या पुलासह, बगलमार्ग, मुस्लिमवाडा आणि आयडीसी रस्त्यावरही वाहने खोळंबून पडली होती.

Traffic Jam Problem
Goa Crime: दीपाली मेथा खूनप्रकरण; प्रियकराला जन्मठेप

रुग्णवाहिकाही अडकली

चक्का जाममुळे अनेकजण अडकून पडले. रुग्णवाहिकेलाही या समस्येचा सामना करावा लागला. अखेर वाहतूक विभागाच्या पोलिसांनी धाव घेऊन काही नागरिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली. जवळपास दोन तास अडकलेल्या वाहनचालकांसह प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. अलीकडच्या काळात एवढी मोठी वाहतूक कोंडी झाली नव्हती, अशी प्रतिक्रिया अनेकजण व्यक्त करत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com