Goa Accident : गोव्यात 36 ठिकाणी वाहतुकीला धोका; अपघातप्रवण क्षेत्रे जाहीर

अपुरा निधी : कामात अडथळा; पीडब्ल्यूडी व पोलिसांकडून तपासणी
Goa Accident : गोव्यात 36 ठिकाणी वाहतुकीला धोका; अपघातप्रवण क्षेत्रे जाहीर
Published on
Updated on

Goa Accident : राज्यातील विविध भागांत 36 ठिकाणे अपघातप्रवण क्षेत्रे निवडण्यात आली आहेत. या क्षेत्राची तपासणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (पीडब्ल्यूडी) राष्ट्रीय महामार्ग, रस्ते व पूल या विभागामार्फत करण्यात येत आहे. यामध्ये 25 ठिकाणे अपघातास धोकादायक, तर 14 ठिकाणांवर वारंवार अपघात घडल्याने ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत. याप्रकरणी हल्लीच वाहतूक पोलिस व पीडब्‍ल्यूडी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने तपासणी सुरू करून रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलली असली तरी निधीअभावी हे काम अडले आहे.

वाहनचालकांवर नियंत्रण येण्यासाठी या ठिकाणी ‘स्पीड रडार’ तसेच सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत. ज्या ठिकाणी अपघाताचा संभव आहे त्याची सविस्तर माहिती देणारे पत्र वाहतूक पोलिस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी 6 मे 2022 रोजी पाठविले आहे.

पणजीतील कदंब पठार येथील साईबाबा मंदिराशेजारील महामार्ग तसेच रायबंदर रस्ता हे ‘ब्लॅक स्पॉट’ची तसेच दिवजा सर्कल येथील ठिकाणची तपासणी करण्यात आल्याची माहिती पणजी वाहतूक पोलिस निरीक्षक ब्रँडन डिसोझा यांनी दिली. पणजीतील दिवजा सर्कलजवळ गेल्या तीन वर्षात 23 अपघात घडले आहेत.

Goa Accident : गोव्यात 36 ठिकाणी वाहतुकीला धोका; अपघातप्रवण क्षेत्रे जाहीर
Goa Rain Update : आजपासून पुढील चार दिवस राज्यात यलो अलर्ट

धोकादायक ठिकाणे : उपायाची गरज

पणजी : दिवजा सर्कल

कळंगुट : पालमारिना रिसॉर्टजवळ, डॉल्फिन सर्कल, प्रभुवाडा

म्हापसा : ग्रीन पार्कजवळ

साळगाव : जंक्शन

पर्वरी : दामियान दी गोवा, जुना मांडवी पूल सर्कल

पेडणे : ओशेलबाग - धारगळ

डिचोली : विठ्ठलापूर, झांट्ये कॉलेज

फोंडा : बोरीजवळ, माशेल - खांडेपार, सोमनाथ मंदिर, आयडीसी कुंडईजवळ, जीव्हीएम कॉलेजजवळ, साखर कारखान्याजवळ

कुळे : पालशकता

कोलवा : विन्स्टेंट बारजवळ, मोंतीर

जंक्शन, मारिया हॉल जंक्शन

केपे : मार्लेक्स बारजवळ

फातोर्डा : होली स्पिरीट चर्चजवळ, पीडब्ल्यूडी ऑफिस जंक्शन, फातोर्डा जंक्शन.

राज्यातील ‘ब्लॅक स्पॉट’

जुने गोवे : साईबाबा मंदिर कदंब पठार व रायबंदर रस्ता

म्हापसा : बिनानी सर्कल

पेडणे : राजवेलवाडा - तोर्से

डिचोली : आयटीआयजवळ

फोंडा : प्रियोळ वळणावर, भोमा, धारबांदोडा व उसगाव

वास्को : सेंट अँड्र्यू चर्चजवळ, शांतीनगर जंक्शन

मडगाव : होली स्पिरीट चर्चजवळ, जुने मार्केट सर्कल, जिल्हा इस्पितळ व भोसले सर्कल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com