Fishing In Goa: नवीन नियमामुळे पारंपारिक मच्छीमार नाराज, सरकारकडे केलीय 'ही' मागणी

गोमंतकीय लोक हे मत्स्यप्रेमी असून त्यांना आहारात नियमितपणे मासे हवे असतात.
Fishing In Goa
Fishing In GoaDainik Gomantak

खोल समुद्रात फिशिंग रॉड घेऊन मासेमारी करणाऱ्यांना शुल्क द्यावे लागणार असल्याचे मत्‍स्‍योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी सांगितले. हा नियम नद्यांमध्ये मासेमारी करणाऱ्यांना लागू होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

परंतु हा नियम प्रसिद्ध झाल्यावर गोव्यात हौशी मासेमारी करणाऱ्यांमधून निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

बाणावली येथील पारंपारिक मच्छीमार पेले फर्नांडीस यांनी सरकारला मासेमारीचे नवीन नियम रद्द करण्याची विनंती केली. त्यांनी असे म्हटले आहे की, 'गोमंतकीय लोक हे मत्स्यप्रेमी असून त्यांना आहारात नियमितपणे मासे हवे असतात.

खाण्याप्रमाणेच इथल्या लोकांना मासे पकडायलाही आवडतात. सरकारने केलेल्या या नियमामुळे पारंपारिक मासेमारी करणाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे'.

फर्नांडीस म्हणाले मासेमारीच्या नवीन नियमांची अंमलबजावणी पूर्णपणे चुकीची आहे. अनेक जण केवळ छंद म्हणून मोठ्या आवडीने मासेमारी करतात. त्यामुळे अशा परिस्थितीत शुल्क लागू करणे पूर्णपणे चुकीचे आहे.

Fishing In Goa
Smart City Panjim: जनतेच्या पैशातून फुकटचे दौरे थांबवा

मात्र मत्‍स्‍योद्योग मंत्र्यांचे असे म्हणणे आहे कि, काही व्यक्ती फिशिंग रॉडचा वापर करून मोठे मासे पकडतात. इतर राज्यांतील व्यक्ती गोव्यात येऊन मोठ्या संख्येत हा प्रकार करत असल्याची माहिती मच्छीमार खात्याला मिळाली आहे. ट्रॉलर्स देखील हेच काम करत असल्याने त्यांच्याकडून शुल्क आकारले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com