CM Pramod Sawant: तुम्ही नवे उद्योग सुरू करा; सरकार सहकार्य करेल !

मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांना ग्वाही: डिचोलीत भाजपचे व्यापारी संमेलन
Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant राज्यातील व्यावसायिकांनी पारंपरिक उद्योगधंद्यावर अवलंबून न राहता, नवीन उद्योग आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढे यावे.

त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून आवश्यक ते सहकार्य निश्चितच मिळेल, अशी आश्वासक ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोली येथे व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करताना दिली.

उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठीचे काही नियम सरकारने शिथिल केले असून,त्याचा व्यावसायिकांनी लाभ घेऊन नवभारत निर्मितीसाठी हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले.

भाजपतर्फे डिचोलीत आयोजित व्यापारी संमेलनात मुख्यमंत्री सावंत बोलत होते. सेवा, सुशासनाला नऊ वर्षे पूर्ण आणि गरीब कल्याण कार्यक्रमांतर्गत भाजपतर्फे आज (रविवारी) या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

सोनारपेठ येथील शेट्ये प्राईड इमारतीत आयोजित या संमेलनास भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, भाजपचे गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, जनसंपर्क अभियानचे राज्य निमंत्रक दयानंद सोपटे, माजी सभापती राजेश पाटणेकर उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्‍घाटन करण्यात आले.

Goa CM Pramod Sawant
Goa Petrol-Diesel Price: पणजी-उत्तर गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल; वाचा आजच्या किमती

देश चालविण्यासाठी नीती, नेता आणि नियतीची गरज असून, या तिन्ही गोष्टी भाजपकडे आहेत. म्हणूनच देशात सुशासन आहे, असे सांगून भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी.रवी यांनी काँग्रेस घराणेशाही आणि लुटारूंचा पक्ष असल्याची टीकाही केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कुशल नेतृत्वामुळे देशाची मान जगभरात उंचावली आहे, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामुळेच देश प्रगतीपथावर आहे,असे मत सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केले.

प्रधानमंत्री गती शक्ती ही युवकांना व्यवसायासाठी प्रोत्साहित करणारी योजना आहे, असे प्रेमेंद्र शेट म्हणाले. डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि दयानंद सोपटे यांनीही आपले विचार मांडले. सूत्रसंचालन सुभाष मळीक यांनी केले.

Goa CM Pramod Sawant
ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर जोशी काळाच्या पडद्याआड

व्यापाऱ्यांनी मांडल्या समस्या

भाजपच्या व्यापारी संमेलनात उपस्थित डिचोलीसह म्हापशातील व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. पारिश खानोलकर यांनी काही व्यापारी ‘जीएसटी’ भरत नाहीत.

त्यामुळे प्रामाणिक व्यापाऱ्यांना त्याचा फटका बसत असल्याचे सांगितले. भगवान हरमलकर, विनायक शिरोडकर आदी व्यापाऱ्यांनीही त्यांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com