पणजी : गोव्यात नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी (Goa Tourist) मोठी गर्दी केली होती. मात्र नववर्षाच्या आगमनानंतर अनेक पर्यटकांनी आपल्या घरचा रस्ता धरल्याचं चित्र आहे. गोव्यात ओमिक्रॉनच्या धर्तीवर कोणत्याही क्षणी निर्बंध लादले जाऊ शकतात. त्यामुळे दरवर्षी जे पर्यटक नववर्षानंतर आठवडाभर गोव्यात मुक्काम करतात, त्याच पर्यटकांनी आता गोव्यातून काढता पाय घेतला आहे.
गोव्यातून (Goa) बाहेर जाणाऱ्या मार्गांवर सकाळपासूनच राज्याबाहेर जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली. मात्र गोव्यातील समुद्रकिनारे आणि हॉटेल्समध्ये (Hotel) पर्यटकांची अजूनही गर्दी कायम आहे. गोव्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल झाले होते. मात्र बहुतांश प्रवाशांनी निर्बंधांच्या शक्यतेने नववर्षाच्या सेलिब्रेशननंतर (Celebration) लगेच घरचा रस्ता धरल्याचं चित्र आहे.
गोव्यात गेला आठवडाभर ख्रिसमसपासून (Christmas) नववर्षाच्या स्वागतासाठी देशी-विदेशी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे राज्यातील समुद्रकिनारे, हॉटेल्स हाऊसफुल्ल झाली होती. साहजिकच कोरोनाचं सावट पाहता सरकारवर कडक निर्बंध लादण्याचा प्रयत्नही झाला. मात्र सरकारने तूर्तास कोणतेही निर्बंध (Restrictions) लादणार नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र 3 जानेवारीनंतर राज्यात निर्बंध लादण्यासाठी पावलंही उचलली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.