Dudhsagar River: त्याच ठिकाणी पुन्हा पर्यटक!! धारबांदोडा नदीवर आंघोळीसाठी आलेल्या 50 जणांची पोलिसांकडून हाकलपट्टी

Dharbandora river news: जीवितहानी होऊ नये म्हणून स्थानिक तसेच पोलीस वेळोवेळी पर्यटकांना इथे न येण्याचा सल्ला देतात, तरीही काही जणांनी याकडे दुर्लक्ष केल्याने पोलिसांनी हे पाऊल उचलं आहे
police action Dharbandora
police action DharbandoraDainik Gomantak
Published on
Updated on

धारबांदोडा: ओकांब - धारबांदोडा येथील दूधसागर नदीवर आंघोळीसाठी आलेल्या पर्यटकांना फोंडा पोलीस व स्थानीक लोकांनी हाकलून लावले. उन्हाळा वाढत असताना थंड पाण्याची अंघोळ करण्यासाठी नदीच्या पर्यटक किनाऱ्यांवर येतात मात्र त्यांना पाण्याचा किंवा नदीचं पात्र किती खोल असेल याचा अंदाज येत नाही आणि अनके जणांवर जीव गमावण्याची वेळ येते. जीवितहानी होऊ नये म्हणून स्थानिक तसेच पोलीस वेळोवेळी पर्यटकांना इथे न येण्याचा सल्ला देतात, तरीही काही जणांनी याकडे दुर्लक्ष केल्याने पोलिसांनी हे पाऊल उचलं आहे.

या ठिकाणी आंघोळ करायला येऊ नका, पाण्याची खोली माहिती नसल्याने जीवित हानी होण्याची शक्यता आहे असा सल्ला पर्यटक धुडकावून लावतात, हा रास्ता तुमच्या बापाचा आहे का असा प्रश्न उपस्थित करतात. गेट बंद असल्यास देखील त्याला न जुमानता गेट उघडून नदी काठी जातात अशी माहिती एका स्थानिकाने दिली. मात्र सध्या या भागात पोलीस गस्त घालत आहेत. कुणाच्या जीवावर काही बेतू नये म्हणून पोलीस कार्यरत आहेत.

वाढदिवस ठरला शेवटचा दिवस

काही दिवसांपूर्वी काणकोण येथून आलेला एक तरुण याच ठिकाणो मृत्यू पावला. मित्रांसह वाढदिवस साजरा करायला आलेल्या या युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाला. असे आणखीन अपघात घडू नयेत म्हणून पोलिसांनी गस्त वाढवली आहे.

police action Dharbandora
Dudhsagar नदीत बुडालेल्या पर्यटकाचा मृतदेह तब्बल 17 दिवसानंतर सापडला

या कारवाईचा एक भाग म्हणून गुरुवार (दि.०१) रोजी गस्त घालायला आलेल्या पोलिसांच्या हाती जवळपास ५० पर्यटक सापडले आणि पोलिसांनी पर्यटकांना ओकांब - धारबांदोडा येथील नदीवरून हाकलून लावलं.

गेल्या शनिवारी मित्रांसह नदीकाठी आलेला तरुणच पुन्हा नवीन मित्रांसह आल्याचं आढळून आलं आहे, यावरून तरुणांना जीवाची किंमतच राहिली नाही का असा प्रश्न उपस्थित होतो. अशा परिस्थितीत पोलिसांनी नदीकाठी गस्त वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com