Tourist Assault Goa: हरमलमध्ये पुन्हा राडा; वेंगुर्ल्यातून आलेल्या पर्यटक मुलांना बेदम मारहाण

Arambol Goa: उशीरा रात्री त्यांना पुढील उपचारासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
Tourist Assault Goa: हरमलमध्ये पुन्हा राडा; वेंगुर्ल्यातून आलेल्या पर्यटक मुलांना बेदम मारहाण
Tourist Assault GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मांद्रे: हरमल समुद्रकिनाऱ्यावर स्थानिक पर्यटकाच्या झालेल्या खुनाच्या घटनेवरुन वातावरण तापले असताना आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वेंगुर्ला, सिंधुदुर्ग येथून गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या मुलांना हरमल येथे बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. बुधवारी (२९ जानेवारी) घडलेल्या या घटनेत चारजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आलीय.

जखमींना सुरुवातीला उपाचारासाठी तुये येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले. दरम्यान, उशीरा रात्री त्यांना पुढील उपचारासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. घटना समोर आल्यानंतर मांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच, घडलेल्या घटनेची माहिती घेतली.

Tourist Assault Goa: हरमलमध्ये पुन्हा राडा; वेंगुर्ल्यातून आलेल्या पर्यटक मुलांना बेदम मारहाण
Cyber Crime: कोटीचा गंडा घालणारा पाचवा संशयित जेरबंद! सायबर टोळीचा पर्दाफाश; उत्तरप्रदेशातून घेतले ताब्यात

मांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेंगुर्ल्यातून आलेले पर्यटक भोमा, पालिये येथे सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यपान करत होते. यावेळी स्थानिकांनी त्यांना जाब विचारला. दरम्यान, यावरुन स्थानिक आणि पर्यटक युवक यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली. याचे पर्यावासन मारामारीत झाले. स्थानिकांनी पर्यटकांना बेदम चोप दिल्याचे समोर आले आहे. मांद्रे पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Tourist Assault Goa: हरमलमध्ये पुन्हा राडा; वेंगुर्ल्यातून आलेल्या पर्यटक मुलांना बेदम मारहाण
Bardez Water Crisis: ‘जलसंपदा’च्‍या अभियंत्यांची खैर नाही! मुख्यमंत्री खवळले; बार्देशातील ‘पाणीबाणी’ वर व्यक्त केली दिलगिरी

खुनाच्या घटनेनंतर हाणामारीचा प्रकार

हरमलच्या स्थानिक युवकाचा समुद्रकिनारी मारहाणीत खून झाल्याची घटना ताजी असताना आता हाणामारीचे नवे प्रकरण उघडकीस आले आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक युवक अमर बांदेकर याला शॅकवर केलेल्या मारहाणीत त्याला जीव गमवावा लागला होता. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांना अटक केली असून, २५ लाखांच्या दंडासह शॅकचा परवाना देखील रद्द केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com