
तिसवाडी, पर्यटन खात्याकडून आयोजित सांजाव पार्टी धावजी-जुने गोवेत हेलिपॅड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
पार्टीचे उद्घाटन आमदार राजेश फळदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. पारंपरिक संगीत, नृत्य, गोव्यातील पारंपरिक खाद्यपदार्थ आणि अनेक उत्साही क्रियाकलापांनी भरलेल्या या संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमाने आनंद आणि एकात्मतेचे वातावरण निर्माण केले.
सर्वोत्कृष्ट कोपेल स्पर्धा, व्यक्ती, जोडपे आणि कुटुंबांसाठी सर्वोत्कृष्ट सांजाव वेशभूषा स्पर्धा, दाम्पत्यासाठी सर्वोत्कृष्ट सांजाव वेशभूषा स्पर्धा, सर्वोत्कृष्ट पारंपरिक स्वयंपाक स्पर्धा आणि पॉट ब्रेकिंग आणि कोकोनट रोलिंग सारख्या मजेदार खेळांसारख्या स्पर्धा झाल्या.
पर्यटन खात्याचे संचालक सुनील अंचिपाका, पर्यटन खात्याचे उपसंचालक राजेश काळे, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) उपमहाव्यवस्थापक लक्ष्मीकांत वायंगणकर, जीटीडीसीचे दीपक नार्वेकर, सचिन गोरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.