Goa Tourism: सावधान! राज्यातील अवैध जलक्रीडा उपक्रमांवर पर्यटन विभाग करणार कारवाई

मिरामार समुद्रकिनारी अधिकारी, पोलीस बंदोबस्त
Illegal boating business in coastal area
Illegal boating business in coastal areaDainik Gomantak

पणजी: पर्यटन स्थळांवरील सतत होणाऱ्या ‘उपद्रव’ विरुद्ध दंड आकारण्याचा आदेश जारी केला. या दरम्यान, पर्यटन विभागाने बुधवारी मिरामार समुद्रकिनाऱ्यावरील “बेकायदेशीर” जलक्रीडा उपक्रमांवर कारवाई केली.

(tourism department will take action against illegal water sports activities in goa state)

Illegal boating business in coastal area
Land conversion : जमीन रूपांतरप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना मिळणार विशेषाधिकार

विभागाचे अधिकारी आणि पोलिस कर्मचारी दुपारी समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले यावेळी घटनास्थळी संबंधितांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याने त्यांना जलक्रीडा थांबवण्याचे निर्देश दिले होते.

“संपूर्ण मिरामार समुद्रकिनाऱ्यावर जलक्रीडा उपक्रमांसाठी कोणतेही क्षेत्र निश्चित केलेले नाही. याठीकाणी सुरक्षिततेच्या नियमांचे स्पष्ट उल्लंघन करत लाइफजॅकेटशिवाय पर्यटक जलक्रीडा करताना अढळले आहेत. किमान सात बोटी बेकायदेशीरपणे चालवताना आढळून आल्या आहेत,” असे पर्यटन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Illegal boating business in coastal area
Goa News: 19 वर्षीय मुलीच्या ‘ॲप’चे मूल्य 600 कोटी

“काही बोट चालकांनी तयार केलेली कागदपत्रे वैध नाहीत. काहींकडे नोंदणीच्या प्रती आहेत, ज्यांचे नूतनीकरण झालेले नाही. त्यांना येथे जलक्रीडा उपक्रम राबविण्याची परवानगी नाही." असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, दलालांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांना पर्यटकांशी व्यवहार करण्याची परवानगी आहे का, याची पडताळणी सुरू आहे.

दरम्यान, दुपारी कडक उन्हात पर्यटकांची गैरसोय होत असताना ही कारवाई का केली जात आहे, अशी विचारणा एका स्थानिक रहिवाशाने अधिकाऱ्यांना केली. “त्यांनी सकाळीच कामे का थांबवली नाहीत? काही लोकांनी आधीच पैसे भरून तिकिटे मिळवली आहेत. त्यांना परतावा कसा मिळेल?" असा प्रश्न स्थानिक रहिवाशाने अधिकाऱ्यांना केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com