Tomato Rate : पणजी, राज्यात पुन्हा एकदा टोमॅटो व कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी टोमॅटोचे दर ७० रुपयांपर्यंत गेले होते.
नंतर अलिकडे हा दर ३० रुपयांपर्यंत घसरला होता. परंतु आता पुन्हा टोमॅटोचा दर ५०ते ६० रुपये प्रतिकिलो एवढा आहे. दरम्यान,महिन्याभरापासून कांद्याचे दर हे ६० रूपये प्रती किलोवर स्थिर आहेत.
दरम्यान, फलोत्पादनाच्या गाळ्यांमध्ये कांदा ५३ रुपये तर टोमॅटो ४४ रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे राज्यातील मध्यमवर्गीय कुटुंबे खरेदीसाठी या गाळ्यांकडे वळत आहेत. राज्यात कांदा, टोमॅटोचे उत्पन्न घेतले जात नाही, त्यामुळे टोमॅटोसाठी राज्याला बेळगाव बाजारावर अवलंबून रहावे लागते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.