
थिवी ते डिचोली वीज उपकेंद्रापर्यंत 33 केव्ही भूमिगत विजवाहिनी प्रकल्पाची पायाभरणी आज वीजमंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रकल्पावर एकूण 28 कोटी रुपये खर्च येणार असून, गोव्यातील वीज पुरवठा प्रणालीच्या सुधारणा आणि स्थिरतेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सकाळपासून युपीआयची सेवा ठप्प झाली असल्याने लाखो ग्राहक चिंतीत आहेत.
कुडचडे अग्निशमन केंद्र ते खांडीवाडा, शिरफोड आणि बागवाडा येथील अंडरपासपर्यंतच्या अप्रोच रोड प्रकल्पाचा अंदाजे खर्च १० कोटी आहे. या प्रकल्पाचा उद्देश वाहतूक कोंडी कमी करणे आणि स्थानिकांसाठी कनेक्टिव्हिटी सुधारणे असा आहे.
१ जानेवारी ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत गोवा पोलिसांनी राज्यभरात अनधिकृत फेरीवाले, भिकारी आणि दलालीच्या क्रियाकलापांमध्ये सहभागी असलेल्या एकूण १२४६ व्यक्तींविरुद्ध कारवाई केली.
जेएमएफसी म्हापसा यांनी कुख्यात ड्रग माफिया अटालाला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात पोलीस अटालाची चौकशी करतील आणि प्रकरणाशी संबंधित पुरावे गोळा करतील.
विधानसभा निवडणुकीला अजून दोन वर्षे आहेत, पण मी असेल की नसेल हे मला माहित नाही : मंत्री सुदिन ढवळीकर
आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन बेटिंग लावताना मनीषकुमार कृष्णानी (३९), गोपालबाई कोकरा (४५), संदीप पंजवानी (३०) आणि जितेंद्र करमानी (३६) यांना गोवा पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ६ मोबाईल फोन, एक लॅपटॉप आणि ४,१०,००० रुपयांचे सामान जप्त करण्यात आले आहे.
वाळपई श्री हनुमान देवस्थानात हनुमान जयंती उत्साहात, मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती.
मायरान रॉड्रिक्सकडून ४. १२५ किलो सोनं, ४१ लक्षणहून अधिक रोख जप्त करण्यात आला आहे.
पाळणा आणि अन्य कार्यक्रमांनिशी डिचोलीत हनुमान जन्मसोहळा उत्साहात. शेकडो भक्तांनी घेतले श्री मारुतीरायाचे दर्शन.
गुन्हे शाखेने नागोआ येथे अमली पदार्थांवर छापा टाकला आणि सेबास्टियन दुआ (३५, घाना) याला १५,००,०००रुपये किमतीचे २६.३०४ ग्रॅम वजनाचे एक्स्टसी टॅब्लेट्स/एमडीएमए हे सायकोट्रॉपिक पदार्थ बाळगल्याबद्दल अटक केली; एक दुचाकी देखील जप्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.