
माशेल येथील १३ वर्षे ५ महिन्याची विध्यार्थीनी बेपत्ता झाल्या प्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा केला नोंद. निरीक्षक योगेश सावंत याप्रकारणी करीत आहे अधिक तपास
आम्ही जीएमसी डॉक्टरांना पाठिंबा देतो. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आधीच माफी मागितली आहे आणि मी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही त्यांच्याशी बोलण्यास सांगितले आहे. डॉक्टर हे आमच्यासाठी देवासारखे आहेत असं भाजप अध्यक्ष दामू नाईक म्हणाले.
ताळगावच्या सरकारी शाळेमध्ये प्रायमरी आणि प्री प्रायमरी मिळून शंभरहून जास्त मुलं या शाळेमध्ये शिक्षण घेतात. जीपीएसटीसाठी तीन शिक्षिका आहेत आणि प्री प्रायमरीसाठी अजूनही एकही टीचर उपलब्ध नसल्याने आम्हा सर्व शिक्षकांना त्या मुलांकडे लक्ष द्यावं लागतं आणि याचा भरपूर त्रास आम्हाला होतो.
"माझा अपमान झालाय, आरोग्यमंत्र्यांनी घटना घडलेल्या कॅज्युअल्टीमध्येच येऊन सार्वजनिकरित्या माझी मागितली पाहीजे. जर त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही आमचा संप सुरूच ठेवू" असं डॉ. रुद्रेश कुट्टीकर म्हणाले आहेत.
डॉ. रुद्रेश यांच्या निलंबनाचे आदेश अद्याप जारी केलेले नाहीत. मंत्री विश्वजित राणे यांच्या जाहीर माफीबद्दल मंत्रालय कार्यालयाला संदेश पाठवण्यात आला; प्रतिसादाची वाट पहिली जातेय. व्हिडिओग्राफी करण्यास आता बंदी; अपघातात पोलिस तैनात केले जातील. कडक एसओपी तयार करण्यासाठी ४ विभागीय अधिकारी. घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करणार: डीन डॉ. शिवानंद बांदेकर.
रविवारी रात्री युवतीच्या विनयभंग केल्याप्रकरणी कुर्टी खांडेपारचे विद्यमान पंच सदस्य आणि माजी सरपंच अभिजीत गावडेंविरोधात फोंडा पोलिस स्थानकात गुन्हा नोंद.तपास सुरू.
आयएमडीने १३ जून २०२५ रोजी गोव्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ९, १२, १४ आणि १५ जून २०२५ रोजी यलो अलर्ट. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज.
डॉक्टरांनी जीएमसीच्या डीनना विनंती केली आहे की,
त्यांनी कॅम्पसमध्ये परवानगी असलेल्या व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीविरुद्ध एफआयआर दाखल करावा, कारण ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन आहे.
मंत्री विश्वजित राणे यांनी डॉ. रुद्रेश यांची जाहीर माफी मागावी.
व्हीआयपी वागणूक थांबवावी लागेल.
रस्त्यांवरील गुरांमुळे सध्या राज्यात अपघातात वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात गोशाळेची आवश्यकता आहे : मंत्री सुभाष शिरोडक
भाईडवाडा कोरगाव रस्ता धोकादायक, दुरुस्ती करण्याची मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांची माग
पणसुले- धारबांदोडा येथे पार्क केलेल्या ट्रकला कारची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या उत्तम सिन्हा ( ३२, हवेली -कुर्टी ) याच्यावर गोमेकोत उपचार सुरू असताना रात्री मृत्यू
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.