Goa News: कर्नाटकच्या मद्यधुंद तरुणांकडून तरुणीचा छळ; वाचा गोव्यातील दिवसभरातील घडामोडी

Today's Marathi Breaking News 09 July 2025: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

कर्नाटकच्या मद्यधुंद तरुणांकडून युवतीचा छळ

मये येथील स्थलांतरीत मालमत्तेतील ऑगस्ट 2014 पूर्वीच्या घरांनाही आता मिळणार सनद

मये येथील स्थलांतरीत मालमत्तेतील ऑगस्ट 2014 पूर्वीच्या घरांनाही आता मिळणार सनद. नजरचुकीने अर्ज न केलेल्या घरमालकांना संधी. 10 जुलैपासून अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ. येत्या ऑक्टोबरपर्यंत मिळणार नव्वद दिवसांची मुदत. सरकारी सूत्रांची माहिती

गावणेत कार आणि टॅम्पोत अपघात,टॅम्पो चालक दारुच्या नशेत

गावणे,मडकई येथे पुर्वाचारी देवस्थानाजवळ कार आणि टॅम्पोत अपघात. मंगळवारी सकाळची घटना.टॅम्पोचालक होता दारुच्या नशेत.फोंडा पोलिस स्थानकात कारचालक व्यंकटेश गावडे यांच्याकडून तक्रार दाखल.

गेल्या दीड वर्षांपासून सकाळी ७ वाजता कोडली ते फोंडा मार्गावरील खासगी बस सेवा बंद

गेल्या दीड वर्षांपासून सकाळी ७ वाजता कोडली ते फोंडा मार्गावरील खासगी बस सेवा बंद आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत असून, कदंब बस सेवा सुरू करण्याची पालकांकडून मागणी

राष्ट्रीय महामार्ग अनमोड या ठिकाण खचलेल्या रस्त्यावर दुरुस्तीचे काम चालू

राष्ट्रीय महामार्ग अनमोड या ठिकाण खचलेल्या रस्त्यावर दुरुस्तीचे काम चालू.घटनास्थळी वाहतूक व कुळे पोलिस वाहतूक तैनाद.

केपेममधील गुडीवाडा येथे एक महिला पादचारी मृत्युमुखी

हिट अँड रन केसमध्ये केपेममधील गुडीवाडा येथे वृत्त दिले आहे की, रेवती गावकर नावाची एक महिला पादचारी बसने धडकून मृत्युमुखी पडली. रेवती गंभीर जखमी झाली आणि नंतर तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.

पर्रा हत्याकांड; पितापुत्र जोडीला अटक

म्हापसा पोलिसांनी पारा स्थलांतरित हत्येप्रकरणी ओडिशा येथील रहिवासी असलेल्या सत्या नबरंगपुरा (५०) आणि थबीर नबरंगपुरा (३१) या पिता-पुत्रांना ताब्यात घेतले.

सुर्ल साखळी येथे झाड पडून वीजखांब गाडीवर

देऊळवाडा सुर्ल साखळी येथे आंबाड्याचे झाड वीज वाहिन्यांवर पडून दोन वीजखांब मोडले. त्यातील एक वीजखांब येथील श्री सिध्देश्वर देवस्थानचे पुजारी गुरूदास वझे यांच्या कारवर पडल्याने त्यांच्या कारचे नुकसान झाले.

म्हादई नदीत मृतदेह वाहून आल्याची माहिती

गांजे येथील म्हादई नदीत मृतदेह वाहून आल्याची माहिती मिळाल्यावर फोंडा पोलिसांची उसगाव पूल ते गांजे पर्यंत सुरु केली शोध मोहीम

विठ्ठलापूर वाळवंटी तिरी विष्णू शेषनाग गंगास्नान

आषाढी एकादशीनंतर शेषशयनी एकादशीनिमित्त विठ्ठलापूर साखळीतील श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानतर्फे वाळवंटीच्या पात्रात विष्णू शेषनाग गंगास्नान विधी मोठ्या भक्तीभावाने संपन्न झाला.

फोंडा पोलिसांनी छापा टाकून मटका प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला

शिरोडा येथे सोमवारी रात्री फोंडा पोलिसांनी छापा टाकून मटका प्रकरणी विशाल शिरोडकर (३८, शिवनाथी) व वैकुंठ शिरोडकर (४८, भाटी) यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद. ३३६० रुपये, २ मोबाईल व १ कॅलक्युलेटर जप्त.

पर्रा येथे कामगाराचा निर्घृण खून

फोंडेक वाडो, पर्रा येथे एका ओडिसा कामगाराचा त्याच्याच साथीदार कामगाराकडून निर्घृण खून. सोमवार रात्रीची घटना. म्हापसा पोलिस करत आहेत तपास.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com