मोरजी: वानरमारे समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आपण सरकार दरबारी प्रयत्न करणार असून त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. (To solve the problems of tribal families - MLA Praveen Arlekar )
वानरमारे समाजातील लोकांची प्रत्यक्ष भेट घेऊन आर्लेकरांनी चर्चा केली. समस्या समजून घेतल्या. त्यानंतर ते म्हणाले, रोटी, कपडा, मकान या तीन मूलभूत गरजा माणसाला जगण्यासाठी आवश्यक आहेत. परंतु मूलभूत सुविधांपासून ते वंचित आहेत. अनेक वर्षांपासून मालपे-पेडणे येथे डोंगर माळरानावर ते वास्तव करून राहतात. परंतु त्यांना पक्के घर नाही.
येथील एकूण 50 पेक्षा जास्त वानरमारे कुटुंबीय-सदस्य रानावनात भटकून कामे करतात. ही मंडळी डोंगर माळरानावर देशप्रभू यांच्या जमिनीवर झोपड्यातून राहतात. त्या झोपड्यांना, छप्पर नाही, तेथे वीज नाही, पाणी नाही. उघड्यावर संसार आहे. त्यांच्या झोपडीतील मोठी मंडळी कामाकडे गेल्यावर छोटी मुले राहतात. त्या लहान मुलांना रानटी व सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका आहे. अनेक समस्यांसह राहाणाऱ्या अशा कुटुंबीयांच्या प्रश्न सोडविण्याचा मी प्रयत्न करणार आहे, असेही आमदार आर्लेकर म्हणाले.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
वानरमारे समाजासाठी असलेल्या विविध शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोचविण्यात येणार आहेत. हा समाज मुख्य प्रवाहात आला पाहिजे. त्यांना शिक्षण मिळायला हवे. त्यासाठी नेमकेपणाने प्रयत्न करणार आहे. या विषयावरच मुख्यमंत्री सावंत यांच्याशीही चर्चा करणार आहे, असेही आमदार आर्लेकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.