Tiswadi Agriculture : नेवरा खाजन शेतजमिनीत पुन्हा नदीचे खारे पाणी; शेतीला चालना देण्याचे पोकळ दावे

Tiswadi Agriculture : शेतात खारट पाणी जाणूनबुजून सोडण्यात आले असून महसूल खात्याची सुस्त वृत्ती या नुकसानीला जबाबदार आहे आणि हे डॉ. प्रमोद सावंत सरकारचे शेतीला चालना देण्याचे आणि स्वयंपूर्ण करण्याचे पोकळ दावे दर्शवते, अशी टीका ‘आप’चे उपाध्यक्ष रामराव वाघ यांनी केली.
Tiswadi Agriculture
Tiswadi AgricultureDainik Gomantak
Published on
Updated on

Tiswadi Agriculture :

तिसवाडी, गोव्यातील दुसऱ्या मोठ्या असलेल्या नेवरा खाजन शेतजमिनीत पुन्हा एकदा नदीचे पाणी आल्याने यंदादेखील येथे शेती करता येणार नाही.

शेतात खारट पाणी जाणूनबुजून सोडण्यात आले असून महसूल खात्याची सुस्त वृत्ती या नुकसानीला जबाबदार आहे आणि हे डॉ. प्रमोद सावंत सरकारचे शेतीला चालना देण्याचे आणि स्वयंपूर्ण करण्याचे पोकळ दावे दर्शवते, अशी टीका ‘आप’चे उपाध्यक्ष रामराव वाघ यांनी केली.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री नेवरा येथे आले होते, तेव्हा खजान शेतीची ही दुरवस्था त्यांच्या डोळ्यांसमोर होती.

Tiswadi Agriculture
Goa Politics: 'धर्म खतरे में है' म्हणत गोव्यात मते मागितली, माघार घेण्यासाठी आरजीचा जन्म नाही झाला- मनोज परब

या बेकायदेशीर गोष्टींचे समर्थन करून नुकसानीस मोठ्या प्रमाणावर जबाबदार असलेले भाजपचे स्थानिक नेते माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांना माहिती दिली होती का, असा सवाल वाघ यांनी केला. सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांना शेताचे नुकसान दिसत असताना त्यांनी याकडे डोळेझाक केली असून हे धक्कादायक असल्याचे विधान वाघ यांनी केले.

मानसीची स्थिती आणि मासेमारीसाठी लिलाव जिंकलेल्या ठेकेदारांची यादी नेवरा ओ ग्रँड टेनंट संघटनेने उघड करावी. त्यापैकी किती ठेकेदार संघटनेचे सदस्य आहेत आणि गेल्या वर्षीच्या लिलावात त्यांनी पैसे भरले होते, ही सर्व माहिती जाहीर करण्याची मागणी वाघ यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com