Tillari Dam: अखेर 50 दिवसानंतर तिळारीतून आले गोव्यासाठी पाणी; पर्वरी, साळगावची तहान भागणार

22 डिसेंबरपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे नियोजन होते.
Tillari Dam
Tillari DamDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Tillari Dam: पर्वरी आणि साळगावची तहान भागण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तिळारी धरणाकडून गोव्याकडे येण्यास कालव्यातून पाणी झेपावले आहे. पर्वरी जलशुद्धीकरण प्रकल्पात ते पाणी पोहोचले की दुसऱ्या दिवसापासून पर्वरी आणि साळगावला पुरेसा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

तिळारी धरणाचे पाणी गोव्यात वाहून आणणाऱ्या कालव्यांची 25 वर्षांनंतर दुरुस्ती करण्यासाठी 27 नोव्हेंबरपासून पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. 22 डिसेंबरपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे नियोजन होते.

प्रवाह बंद करण्यासाठी तिळारी धरणाचा कालव्यात उघडणारा दरवाजा खाली आणण्यात आला होता. त्यामुळे प्रवाह पूर्णतः बंद झाला होता.

कित्येक वर्षांनी तो दरवाजा हलविण्यात आला होता. त्या दरवाज्यावर दोन हजार टन पाण्याचा दाब पडल्याने तो थोडासा कलला, त्यामुळे तो जागचा हलणे बंद झाले. त्यामुळे दरवाजा अभियांत्रिकी कौशल्ये वापरून वर उचलण्याचे ठरवण्यात आले. त्यासाठी पुणे येथून तंत्रज्ञ मागवण्यात आले. अखेर त्यांना यश मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Akhada Water Supply
Goa Water Storage
Porvorim elevated road traffic
Goa Rainfall Deficit 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com