Tilari Canal
Tilari Canal Dainik Gomantak

तिलारीच्या मुख्य कालव्याला गळती

तिळारी धरणाच्या डाव्या तीराचा मुख्य कालवा सध्या अतिशय कमकुवत बनला आहे.
Published on

पणजी : तिळारी धरणाच्या डाव्या तीराचा मुख्य कालवा सध्या अतिशय कमकुवत बनला असून, गोव्यात प्रवेश करण्याच्या ठिकाणीच गळती लागल्याने राज्याला 18.23 घनमीटर पाणीपुरवठा करण्यात मर्यादा येत आहेत. हा कालवा पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरल्याने लाटंबार्से, साळ, मुळगाव आणि वळशी या गावांना कमी पाणी मिळत आहे, अशी माहिती जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबईत जलस्रोत सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची 19 वी बैठक झाली होती. त्यानंतर गोवा आणि महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांची बैठकही झाली होती. त्यात गळतीच्या विषयाचा उल्लेख झाला होता. गोवा जलस्रोत खात्याचे तत्कालीन मंत्रीही या बैठकीस उपस्थित होते.

Tilari Canal
मडकईत प्रस्थापितांत ‘कांटे की टक्कर’!

गोव्याच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना कालव्याची डागडुजी आणि इतर कामे पूर्ण करण्याची विनंती केली होती. गोव्यातील तिलारीच्या कालव्यांची दुरुस्ती आणि देखरेखीचे काम टप्प्या-टप्प्याने हाती घेतले जात आहे. डागडुजी आणि पुनर्वसनाचे काम दोन टप्प्यांत होत आहे. त्यासाठी अनुक्रमे 28.17 कोटी रुपये आणि 18 कोटी रुपये खर्च केले जातील, असे शिरोडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com