मडगाव: पोस्टल मतपत्रिकांद्वारे टाकण्यात आलेली सुमारे 2,500 मते नाकारली आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मडगावच्या शॅडो कौन्सिलने मंगळवारी केली आहे. दरम्यान या संदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. शॅडो कौन्सिलचे सॅव्हियो कुतिन्हो म्हणाले की मतदान अधिकार्यांनी केलेल्या "गंभीर चुकांमुळे" हा प्रकार घडला आहे. ते पुढे म्हणाले हजारो मतदारांनी दिलेल्या वैध मतांचा हिशोब अजुनही दिला गेला नाही. (2,500 postal ballots rejected in Goa)
राज्यातील विधानसभेसाठी मतदानानंतर, मतदानाच्या दिवशी सेवा बजावणाऱ्या 15,716 सरकारी कर्मचाऱ्यांना टपालाने मत पाठवण्याची मुभा मतमोजणी सुरू होण्यापूर्वीपर्यंत देण्यात आली होती. अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण सावंत यांनी दिली
पोस्टल वोटिंगमध्ये यांचा होता समावेश
मतदान केंद्रावरील कर्मचारी, कायदा व सुव्यवस्था हाताळणारे पोलिस कर्मचारी (Goa Police), तालुकावार निर्वाचन अधिकाऱ्यांच्या कार्यालयामधील कर्मचारी तसेच निवडणूक कार्यालयातील कर्मचारी यांना मतदानाच्या दिवशी मतदान करता आलेले नव्हते. त्या सर्वांना त्यांच्या मतदारसंघातील उमेदवारांची मतपत्रिका देण्यात आली होती. त्यांनी ती टपालाने संबंधित मतदारसंघ (Constituency) असलेल्या निर्वाचन अधिकाऱ्यांकडे किंवा प्रत्यक्षात त्या संबंधित निर्वाचन अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठेवण्यात आलेल्या मतदारसंघ पेटीत जमा करण्यास सांगण्यात आले होते. या मतपेट्या मतमोजणीच्या दिवशी उघडण्यात येणार आहेत, असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.
290 जणांनी केले ऑनलाईन मतदान
या निवडणुकीत कामानिमित्त गोव्याबाहेर (Goa) असलेल्या 290 जणांनी ऑनलाईन मतदानासाठी (ईटीपीबीएस) अर्ज केले होते. याव्यतिरिक्त 80 वर्षे व त्यावरील 29797 ज्येष्ठ नागरिक व 9590 विकलांग मतदार आहेत. त्यांच्या घरी जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची मते जमा केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.