गोवा: गेल्या काही दिवसांपासून गोव्यात वेलिंगकरांनी सेंट झेवियर्स यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे वाद सुरु झाला आहे. सुभाष वेलिंगकर यांनी झेवियर्स यांच्या अवशेषांची DNA चाचणी करण्याची मागणी केली होती आणि यामुळे राज्यातील काही समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्याने त्यांनी जोरदार विरोध करायला सुरुवात केली. गेल्या दोन दिवसांत हा वाद बराच चिघळला असून वेलिंगकरांना ताबडतोब अटक केली जावी अशी मागणी अनेकांकडून केली जातेय.
आज गोव्यातील तियात्रिस्त समुदायाकडून वेलिंगकर यांना अटक व्हावी असे आवाहन करण्यात आले. सुभाष वेलिंगकर यांनी सेंट झाव्हियर्स यांच्यावर केलेली टिप्पणी ही निंदनीय आहे, तरीही वेलिंगकरांना वेळेत अटक करण्यात गोवा राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केलाय. तियात्रिस्त समुदायाच्या मते राज्य सरकारची ही वागणूक केवळ राज्यातील जनतेमध्ये फूट पाडण्यासाठी आखली गेलीये आणि म्हणूनच आम्ही DGP नी लवकरात लवकर सुभाष वेलिंगकर यांना अटक करावी अशी मागणी करतोय असं ते म्हणालेत.
सुभाष वेलिंगकर यांनी काही दिवसांपूर्वी सेंट झेवियर्स यांच्या अवशेषांची DNA चाचणी व्हावी अशी मागणी केली होती आणि "मी यामधून केवळ सत्य समोर आणून या प्रश्नावर कायमचा पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न करतोय" असं स्पष्टीकरण देखील दिलं होतं, मात्र वेलिंगकरांच्या या वक्तव्यामुळे समाजात तणाव निर्माण झालाय आणि त्यांना त्वरित अटक व्हावी अशी मागणी केली जातेय. वेलिंगकरांकडून मात्र अटकेपूर्वीच जमीनीचा अर्ज करण्यात आला असून याला विरोध करणारे ४ अर्ज दाखल झालेत, या संपूर्ण विषयावर आज पणजीतील सत्र न्यायालयात संध्याकाळी ५ वाजता सुनावणी होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.