Tiatra : कला अकादमीत तियात्र पुन्हा सुरू

Tiatra : जवळ जवळ तीन वर्षानंतर कला अकादमीच्या अंगा-खाद्यांवर व्यावसायिक तियात्रांचे बोर्ड पुन्हा खेळायला सुरुवात झाली आहे.
Tiatra
Tiatra Dainik Gomantak

Tiatra :

जवळ जवळ तीन वर्षानंतर कला अकादमीच्या अंगा-खाद्यांवर व्यावसायिक तियात्रांचे बोर्ड पुन्हा खेळायला सुरुवात झाली आहे. अर्थात हे बोर्ड लावण्यासाठी अधिकृत जागा प्रदान केलेली नसल्यामुळे सद्यातरी कला अकादमीच्या गेटचा आसरा घेऊन प्रयोगाच्या तारखा-वेळेची माहिती देणारे पोस्टर्स तिथे टांगले गेले आहेत.

लॉरी तावारीस या लेखक-दिग्दर्शकाचा ‘काळजातली फुलां’ हा व्यावसायिक त्रियात्र 21 मार्च रोजी 3.30 वाजता सादर होणार आहे. कला अकादमीच्या तथाकथीत नूतनीकरणानंतर मा. दीनानाथ नाट्यगृहात सादर होणारा, व्यावसायिक तियात्राचा हा पहिला प्रयोग असेल.

कला अकादमीच्या वास्तूच्या नूतनीकरणासाठी लागलेल्या विवादास्पद विलंबामुळे सर्वाधिक नुकसान कुणाचे झाले असेल तर ते तियात्र उद्योगाचे व तियात्र कलाकारांचे. कला अकादमी उत्तर गोव्यातील महत्त्वाचे तियात्र सादरीकरण केंद्र आहे.

Tiatra
Goa Forward: निवृत्त ‘बीडीओ’ला दुसऱ्यांदा सेवावाढ; गोवा फॉरवर्डचा आरोप

वर्षभरात कला अकादमीच्या नाट्यगृहात शेकडो प्रयोग सादर होतात. तियात्राच्या अर्थकारणाला बळ देणारे हे केंद्र गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक काळ बंद राहिल्यामुळे या उद्योगाला अपरिमित नुकसान सोसावे लागले.

पण आता कला अकादमीने व्यावसायिक तियात्रांना हिरवा झेंडा दाखवल्यामुळे हे ग्रहण सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. उत्तर गोव्यातील तियात्र रसिकांचा दुष्काळही त्यामुळे संपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Tiatra
Bhandari Community In Goa: गोव्यातील भंडारी समाजात फूट, बेकायदा कारभाराचा आरोप

मा. दीनानाथ नाट्यगृह व्यावसायिक सादरीकरणासाठी जरी खुले केले असले तरी त्यातील सुविधांना मात्र अजूनही परिपूर्णता लाभलेली नाही. त्यातील ध्वनी यंत्रणेची समस्या तर चिंता करावी अशीच आहे. एकेकाळी उत्कृष्ट ध्वनियंत्रणेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या नाट्यगृहात, प्रयोग सादर करणाऱ्या संस्थांना आज स्वतःची ध्वनीयंत्रणा घेऊन यावे लागत आहे यापेक्षा या नाट्यगृहाचे दुर्देव ते काय असेल?

परिपूर्ण सुविधा नसतानासुद्धा या नाट्यगृहाचे भाडे (रु.१९,४७० रुपये, ४ तासांसाठी) प्रयोग सादर करणाऱ्या संस्थांना पूर्ण भरावे लागते.

असे असूनही व्यावसायिक तियात्र संस्थांनी या नाट्यगृहात प्रयोग करायची तयारी केली आहे. या उद्योगापाशी त्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय तरी कुठला आहे? १० वेगवेगळ्या तियात्र संस्थांनी, सुमारे २५ प्रयोगांसाठी तारखा मिळण्यासाठी अर्ज केले आहेत.

सार्वजनिक बांधकाम खात्याकडून नूतनीकरण केलेल्या वास्तूचे हस्तांतरण कला अकादमीकडे अजूनही झालेले नाही. त्यामुळे हे अर्ज अध्यक्ष, गोविंद गावडे यांच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. (ही यातील आणखीन एक खोच आहे.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com