गोव्यात मजुरी करून भरायचे पोट, झारखंडचे तीन युवक विशाखापट्टणम येथून बेपत्ता; रहस्य उलघडेना

शेतीच्या कामासाठी तरुण गोव्याहून झारखंडला परतत होते. मात्र, विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावरून तिघेहीजण बेपत्ता झाले आहेत.
Three Youth From Jharkhand are Missing
Three Youth From Jharkhand are MissingDainik Gomantak
Published on
Updated on

Three Youth From Jharkhand are Missing: झारखंडच्या गुमला जिल्ह्यातील रामपूर गावातील तीन तरुण विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावरून रहस्यमयरीत्या गायब झाले आहेत. तिघेही तरुण गोव्यात मजुरीचे काम करण्यासाठी गेले होते. शेतीच्या कामासाठी तरुण गोव्याहून झारखंडला परतत होते. मात्र, विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावरून तिघेहीजण बेपत्ता झाले आहेत.

उदित सोरेंग (वय 23), आशियान सोरेंग (वय 33) आणि फ्रेड्रिक सोरेंग (वय 38) (तिघेही रा. रामपूर) असे बेपत्ता झालेल्या तीन युवकांची नावे आहेत.

झारखंड येथील एका स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, विशाखापट्टणममधील एका तरुणाची प्रकृती खालावली. तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना, स्थानकावरील गर्दीमुळे तिन्ही तरुण वेगळे होऊन गायब झाले.

तिघे तरुण 2 जून रोजी सायंकाळी अमरावती एक्स्प्रेसचे जनरल तिकीट काढून गावाकडे परतत होते. 3 जून रोजी विशाखापट्टणममध्ये एका तरूणाची प्रकृती खालावली. त्याच्या उपचारासाठी तरून स्टेशनवर खाली उतरले. पण, गर्दीमुळे ते वेगळे झाले. अशी माहिती समोर आली आहे.

Three Youth From Jharkhand are Missing
दूधसागरला फिरायला येणाऱ्या पर्यटकांसाठी महत्वाची बातमी, पर्यावरण पर्यटन विभागाने घेतला मोठा निर्णय

बातमीत दिलेल्या माहितीनुसार, तिघांपैकी उदित नावाचा युवक 6 जूनपर्यंत कुटुंबाच्या संपर्कात होता आणि त्याला घरी नेण्यासाठी नातेवाईकांकडे विनवणी करत होता. त्याच्या नातेवाईकांनीही विशाखापट्टणम गाठून उदितचा शोध सुरू केला. परंतु, यापैकी कोणाचाही पत्ता लागला नाही.

तिन्ही तरुणांच्या बेपत्ता झाल्याची नोंद कुरकुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी उदित सोरेंग यांचे नातेवाईक काँग्रेस नेते रोशन बर्वा यांना भेटण्यासाठी आले होते. तीन तरुणांचा शोध घेण्याची विनंती केली. त्यानंतर रोशन बर्वा यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री, कामगार मंत्री आणि उपायुक्तांना टॅग करत ट्विट केले.

दरम्यान, य प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन शोधकार्य सुरू केले आहे. जिल्हा प्रशासन आणि कामगार विभागाने फोन करून मजुरांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे रोशन बर्वा यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com