Goa Panchayat Result: मुरगाव तालुक्यात सात पैकी तीन पंचायतीवर भाजपचे वर्चस्व

Goa Panchayat Result: मुरगाव तालुक्यात सात पैकी तीन पंचायतीवर भाजपचे वर्चस्व
Published on
Updated on

मुरगाव तालुक्यातील सात पैकी तीन पंचायतीवर भाजपचे वर्चस्व. तर इतर पंचायतीत अपक्षांनी बाजी मारली. चिखली पंचायतीत माजी सरपंच सेबी पेरेरा यांच्या पत्नीचा पराभव.बोगमाळो पंचायतीत माजी सरपंच लक्ष्मण कवळेकर पराभूत. तर साकवाळ पंचायतीत गेली वीस वर्षे पंच, सरपंच म्हणून कार्य केलेले गोल्डन मॅन रमाकांत बोरकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. साकवाळ पंचायतीत दक्षिण गोव्याचे भाजप अध्यक्ष तुळशीदास नाईक तिसऱ्यांदा पंच म्हणून निवडून आले आहे. चिखली पंचायतीत माजी उपसरपंच कमला प्रसाद यादव व त्याची पत्नी सुनीता यादव पती पत्नीचा विजय झाला. मुरगाव सातही पंचायतीची मतमोजणी कासव गतीने झाल्याने उमेदवार कार्यकर्त्या बरोबर आजूबाजूचे नागरिक हैराण झाले.

कमला प्रसाद यादव चिखली पंचायतीवर दावा करणार

चिखली पंचायत निवडणूकीत कमला प्रसाद यादव यांचे 4 सदस्यीय पॅनेल प्रचंड मतांनी निवडून आल्यानंतर चिखली पंचायतीवर दावा करणार आहेत. कमला प्रसाद यादव यांच्याशिवाय त्यांच्या पत्नी सुनीता यादव आणि इतर दोन उमेदवार दत्तप्रसाद बांदोडकर आणि सपना कुराडे यांनीही प्रचंड मतांनी विजय मिळवला आहे.

कमला प्रसाद यादव यांनी चिखली ग्रामपंचायतीच्या प्रभाग - 5 मधून विजयी होऊन हॅट्रीक साधली आहे. त्याचे श्रेय त्यांनी आपल्या समर्थक, मित्र आणि शुभचिंतकांना दिले आहे.

चिखली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच निलम नाईक या चिखली ग्रामपंचायतीच्या प्रभाग - 2 मधून विजयी झाल्या आहेत. निलम नाईक यांनी बोलताना आपल्या सर्वमतदारांचे सर्वतोपरी पाठींबा दिल्याबद्दल आणि त्यांना विजयी केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

चिखली पंचायतीचा निकाल :- प्रभाग-1 मारिया मस्करेन्हास(190), प्रभाग -2 नीलम नाईक (200), प्रभाग-3 सुनीता यादव(448), प्रभाग-4 दत्तप्रसाद बांदोडकर(318), प्रभाग-5 कमला यादव (225), प्रभाग-6 सपना कुराडे (312), प्रभाग-7 शैलेश मयेकर (225), प्रभाग-8 फ्रान्सिस्को न्युनीस (265), प्रभाग -9 पूनम चारी (207), प्रभाग-10- ऐश्वर्या कोरगावकर (329), प्रभाग -11 रोमन वाझ (274).

वेळसाळ पाळे पंचायत निकाल :- फ्रान्सिका बारेटो (प्रभाग 1 - 74 मते), प्रभाग 2 मारीया गुविया (165), फ्रान्सिस ब्रागांझा प्रभाग 3 (101 मते), जिम डिसोझा प्रभाग 4 (248), रेमेडीयोस नोरोन्हा प्रभाग 5 (184), रुदीका आंताव प्रभाग 6 (149), प्रभाग 7 किशन सांकोळकर (191).

Goa Panchayat Result: मुरगाव तालुक्यात सात पैकी तीन पंचायतीवर भाजपचे वर्चस्व
Goa Panchayat Result: 150 पेक्षा अधिक पंचायतींत भाजपला स्पष्ट बहुमत; मुख्यमंत्री सावंत यांचा दावा

सांकवाळ जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात यांची मुलगी एश्वर्या थोरात चिकोळणा - बोगमाळो ग्रामपंचायतीच्या प्रभाग - 6 मधून निवडून आली. तर चिकोळणा बोगमाळोचे माजी सरपंच लक्ष्मण कवळेकर यांना हार पत्करावी लागली. तसेच माजी उपसरपंच संकल्प महाले व अरुण नाईक यांचाही विजय झाला.चिकोळणा - बोगमाळो ग्रामपंचायतीमध्ये माजी सरपंच तथा सहा वेळा पंच सदस्य असलेले लक्ष्मण कवळेकर यांचा माजी उपसरपंच अरुण नाईक यांनी पराभव केला. प्रभाग सात मध्ये अरुण नाईक सलग तिसऱ्यांदा निवडून आले.

चिकोळणा-बोगमाळो पंचायत विजयी उमेदवार : लॉरेना कुन्हा (प्रभाग-1 - 54 मते ), कायतानो फ्रिग्रेदो (प्रभाग-2 -137 मते ), आंतोनियो फर्नांडिस (प्रभाग-3 - 62 मते ) ‌‌‌‌‌‌,संकल्प महाले (प्रभाग-4 - 83 मते ). सिंथिया रॉड्रीग्स (प्रभाग-5 - 51 मते ) ऐश्वर्या थोरात (प्रभाग-6 - 292 मते ), अरुण नाईक (प्रभाग-7 - 100 मते )

‌‌‌कासवली पंचायतीत चार वेळा सरपंच पद भूषविलेल्या आणि सहा वेळा पंच म्हणून निवडून आलेल्या श्रीमती मार्था साल्दाना यांना पराभव पत्करावा लागला.

जोस मेरी फुर्तादो यांनी कासावली -आरोसी -कुएली पंचायतीच्या प्रभाग-1 मध्ये प्रचंड मतांनी विजय मिळवला.

कासावली- आरोसी-कुएली ग्रामपंचायतीचा निकाल : जोस मेरी फुताॆदो (प्रभाग-1 - 332 मते), झेवियर परेरा (प्रभाग 2 - 209 मते), लार्सन साल्ढाणा (प्रभाग-3 - 139 मते), अरलिंदा आल्मेदा (प्रभाग-4 - 218 मते), मार्विला दा कोस्ता (प्रभाग - 5 - 176 मते), मॅकिना रॉड्रीग्स (प्रभाग-6 - 161 मते), जेसिका डीसिल्वा (प्रभाग-7 - 129 मते), मारिया फर्नाडिस (प्रभाग - 8 - 102 मते), देवानंद नाईक (प्रभाग-9 - 137 मते).

कुठ्ठाळी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सेनिया परेरा या कुठ्ठाळी ग्रामपंचायतीच्या प्रभाग-2 मधून निवडून आल्या.

कुठ्ठाळी ग्रामपंचायतीचा निकाल पुढील प्रमाणे :- मेलबोने वाझ (प्रभाग 1-190 मते) सेनिया परेरा (प्रभाग-2 -157 मते), रुएला मारिया डिक्रूझ फर्नाडिस (प्रभाग-3 - 175 मते), प्रभाग 4 मधून बिनविरोध, इडोसियाना उर्फ बेबी रॉड्रीग्स (प्रभाग 5 - 121 मते), फ्रान्सिस्को फर्नाडिस (प्रभाग-6 - 178 मते), ओरलींडा लोबो (प्रभाग-7 - 166 मते), अँजेला फुताॆदो (प्रभाग 8 - 159 मते) 1 मायकल डिसा (प्रभाग-9 - 131 मते), उज्वला नाईक (प्रभाग- 10 - 215 मते), दिव्या रायकर (प्रभाग-11 - 204 मते).

केळशी पंचायतीच्या प्रभाग सहाचे उमेदवार सांतान जोस मारिया दा सिल्वा यांना चिठ्ठी पद्धतीने, मतांची बरोबरी झाल्यानंतर विजयी घोषित केले.

केळशी पंचायतीच्या प्रभाग सहाचे उमेदवार सांतान जोस मारिया दा सिल्वा यांना त्यांचे प्रतिस्पर्धी फिलीप लुईस दा सिल्वा यांच्या विरुद्ध मतांची बरोबरी झाल्यानंतर चिठ्ठीद्वारे विजयी घोषित करण्यात आले. शुक्रवारी वास्को येथील रवींद्र भवन बायणा येथील मिनी सभागृहात झालेल्या मतमोजणीनंतर दोन्ही उमेदवारांना बरोबरीत 118 मते मिळाली. मुरगाव तालुक्यातील पंचायत निवडणुकीचे निर्वाचन अधिकारी रणजीत साळगावकर यांनी चिठ्ठी पददतीने काढण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर विजयी घोषित केले.

केळशी पंचायतीमध्ये विजयी झालेले अन्य उमेदवार :- लोपिन्हो झेवियर (प्रभाग-1 - 89 मते), फिलोमेना फिगारेडो (प्रभाग 2 - 111 मते), फ्रान्सिस्को झेवियर फिगारेडो (प्रभाग-3 - 92 मते), कॅटानो जो तावरेस (प्रभाग-4 - 138 मते), मोटेसीना फर्नाडिस (प्रभाग 5 - 151 मते) आणि स्वोझी डिसोझा (प्रभाग 7 - 120 मते).

भाजपचे दक्षिण गोवा अध्यक्ष तुळशीदास नाईक हे सांकवाळ ग्रामपंचायतीच्या प्रभाग-3 मधून विजयी झाले. त्यांना 293 मते मिळाली. त्यांनी आपल्या प्रभागाच्या विकासावर आणि पंचायत कार्यक्षेत्रातील कंपन्या आणि इतर विविध व्यावसायिक घराण्यांकडून महसूल वसुलीच्या मार्गाने कर वसूल करण्यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सांगितले.

माजी सरपंच गिरीश पिल्लई यांना 1065 मते मिळाली, ते सांकवाळ ग्रामपंचायतीच्या प्रभाग-11 मधून मोठ्या फरकाने विजयी झाले. सांकवाळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गिरीश पिल्लई हे वॉर्ड-11 मधून मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याने सरपंचपदासाठी दावा ठोकण्याची शक्यता आहे. गिरीश पिल्लई यांना एकूण 1065 मते मिळाली. त्यांचे बहुतांश समर्थक उमेदवार आपापल्या प्रभागातून विजयी झाले आहेत. गिरीश पिल्लई सरपंचपदासाठी दावा सांगण्याची शक्यता आहे, असा खुलासा सूत्रांनी केला आहे.

‌‌सांकवाळ पंचायतीचा निकाल : प्रभाग-1 संतोष देसाई (478), प्रभाग 2- डेरीक वालेस (139), प्रभाग-3 तुळशीदास नाईक (293), ‌प्रभाग-4 मारीया आझावेदो (277), प्रभाग 5 मावरेलीयो कारव्हालो (253), प्रभाग-6 निधी नाईक (311), प्रभाग-7 रोहिणी तोरस्कर (288), प्रभाग-8 वेलेंटो रॉड्रीग्स (673), प्रभाग-9 जसिया कादर (641), प्रभाग-10 अनुषा लमाणी (539), प्रभाग-11 गिरीष पिछे (2065).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com