...यावरूनच कॉंग्रेसचा दुटप्पीपणा दिसून येतो: सी. टी. रवी

विधानसभा निवडणुकीतील महिलांसाठीच्या जागेवरून सी. टी. रवींची प्रियंका गांधींवर टीका
C. T. Ravi criticizes Priyanka Gandhi
C. T. Ravi criticizes Priyanka GandhiDainik Gomantak
Published on
Updated on

Goa: गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांचे नेते गोव्यात येत आहेत. कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) गोव्यात दाखल झाल्या असून त्यांनी माजोर्डा येथे सभा घेऊन जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. शिवाय विरोधी पक्ष भाजपवर सडकून टीकाही केली. यावर गोवा भाजपचे प्रभारी सी. टी. रवी (C. T. Ravi) यांनी प्रियंका गांधींवर जोरदार पलटवार केला आहे. (C. T. Ravi criticizes Priyanka Gandhi)

C. T. Ravi criticizes Priyanka Gandhi
एसीजीएल स्टोअरला भीषण आग, लाखोंचे नुकसान

माध्यमांशी संपर्क साधताना ते म्हणाले की, 'गोव्यातील महिला प्रियांका गांधी यांना विचारत आहेत की, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत (Uttar Pradesh Election 2022) 40% जागा महिला उमेदवारांना दिल्या जातात आणि गोव्यात महिलांसाठी 1% जागादेखील का नाही? महिला फक्त यूपीमध्येच निवडणूक लढवू शकतात, गोव्यात नाही का? यावरून त्यांचा दुटप्पीपणा दिसून येतो'

सी. टी. रवींच्या या पलटवारावर प्रियंका गांधींची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa State Pollution Control Board report
Narendra Sawaikar Post Controversy
Salman Khan Goa project news
bombay high court goa bench
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com